जळगाव : तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे लाचखोर कार्यकारी अभियंता सुरेश सावंत यांच्या जळगाव, पुणे व सातारा येथील घरांची झडती घेतल्यावर १० लाखांची रोकड सापडली. पहाटे २ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. जळगावातील गिरणा या शासकीय निवासस्थानी ५ लाख ८१ हजार ८०० रुपये, पुण्यातील दोन फ्लॅटमध्ये ४ लाख, लॉकरची चावी व काही दागिने आढळून आले आहेत. भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्यासाठी दोन टक्के याप्रमाणे सव्वा चार लाख रुपयांची लाच घेताना सावंत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रात्री रंगेहाथ पकडले. सावंत कार्यकारी अभियंता व महामंडळाचे सदस्य सचिवही आहेत. कार्यकारी संचालक आर.व्ही. पानसे यांची नुकतीच बदली झाली आहे. ही संधी साधत सावंत यांनी दोन टक्के प्रमाणे रक्कम घेऊन फायली मंजूर करण्याचा सपाटा लावला होता.
लाचखोर अभियंता सावंतकडे सापडली १० लाखांची रोकड
By admin | Updated: April 21, 2017 03:04 IST