शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मध्य प्रदेशचा गड कोण जिंकणार? असे आहेत २०१८ चे निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 09:26 IST

यावेळी मात्र ही निवडणूक भाजपला जड जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समवेत न गेलेल्या आमदारांना पुन्हा संधी देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.

मध्य प्रदेशमध्ये गेल्या निवडणुकीत मोठा उलटफेर झालेला दिसला. भाजपचा पराभव झाला. मात्र, काँग्रेसचे कमलनाथ यांची सत्ता अल्पावधीतच कोसळली. काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह २२ आमदार भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर शिवराजसिंह चौहान यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळाले. यावेळी मात्र ही निवडणूक भाजपला जड जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समवेत न गेलेल्या आमदारांना पुन्हा संधी देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.

२०१८ चे निकालभाजप    १०९कॉंग्रेस    ११४बसप     २अन्य     ५एकूण    २३०

कोणते मुद्दे आहेत महत्त्वाचे?- भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत आजपर्यंत चर्चा रंगली होती. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना अखेर सोमवारी बुधनी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली, तरीही भाजपसमोर ज्योतिरादित्य सिंधिया आणि शिवराज सिंह चौहान हे दोन प्रमुख पर्याय आहे.- भाजप ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच चेहऱ्यावर लढवत आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा कमलनाथ आणि जितू पटवारी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांवर राहणार आहे.- भाजपने मध्य प्रदेशमधील धोका लक्षात घेता, केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे. त्यात नरेंद्र तोमार, फग्गनसिंह कुलस्ते आणि प्रल्हाद पटेल या तीन मंत्र्यांना उमेदवारी जाहीर केली. तसेच ७ खासदारांनाही तिकीट दिले आहे.- आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला रोखण्यासाठी भाजपला सत्ताविरोधी लाटेशी लढा द्यावा लागेल. २००३, २००८ आणि २०१३ मध्ये सलग तीन निवडणुका जिंकल्यानंतर, २०१८ मध्ये भाजपचा काँग्रेसकडून पराभव झाला. त्यामुळे सत्ता टिकविण्यासाठी भाजपला जोर लावावा लागेल.- भ्रष्टाचार, बेरोजगारी, महिला मतदारांसाठी योजना, हिंदुत्व, मोफतच्या योजना या यंदाच्या निवडणुकीत चर्चेत राहणार आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा