शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

एक काळ गाजवला, आता मराठी नेत्यांच्या युगाचा अस्त झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 08:48 IST

मध्य प्रदेशातील मराठी समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे शेजवळकर हे शेवटचे नेते ठरले

अभिलाष खांडेकर

भोपाळ : ग्वाल्हेरचे विद्यमान खासदार विवेक नारायण शेजवळकर यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर मध्य प्रदेशच्या राजकारणातून मराठी नेते पूर्णत: बाजूला फेकले फेकले आहेत. मध्य प्रदेशात मराठी समुदाय मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे या राज्यात अनेक मराठी राजकीय नेते उदयास आले होते.

मध्य प्रदेशातील मराठी समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे शेजवळकर हे शेवटचे नेते ठरले. आता हा समाज नेतृत्वहीन झाला आहे. शेजवळकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित परिवारातून आलेले आहेत. त्यांचे वडील ग्वाल्हेरचे महापौर होते. शिंदे राजघराण्याचा गड समजल्या जाणाऱ्या ग्वाल्हेरमधून शेजवलकरांनी खासदारकीची पाच वर्षे पूर्ण केली. आता त्यांच्या जागी माजी मंत्री भारतसिंग कुशवाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत हरलेले कुशवाह हे मध्य प्रदेश विधानसभाध्यक्ष नरेंद्रसिंह तोमर यांच्या जवळचे समजले जातात. तसेच ओबीसी मतदारांचे समीकरण पाहून कुशवाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्रिपदाला हुलकावणीमराठी नेता कधीच मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. मात्र, भाजपात मराठी नेते मोठ्या संख्येने होते. राजेंद्र धारकर (इंदूर), सुधाकर बापट (सागर), मधुकरराव हरणे (होशंगाबाद), मुकुंद सखाराम नेवाळकर (छत्रपूर), बाबूराव परांजपे (जबलपूर), नारायण धर्मा (इंदूर), डॉ. एम. एस. इंदापूरकर व भाऊसाहेब पोतनीस (ग्वाल्हेर) आणि ८ वेळा इंदूरच्या खासदार राहिलेल्या सुमित्रा महाजन यांचा त्यामध्ये समावेश आहे. यापैकी बहुतेक जण एक तर बाजूला फेकले गेले आहेत किंवा निधन झाले आहे.

सुमित्रा महाजनांनी इंदूरला बनविले भाजपचा बालेकिल्लायंदा शेजवलकरांना ज्याप्रमाणे उमेदवारी नाकारण्यात आली, त्याचप्रमाणे सुमित्रा महाजन यांना २०१९ मध्ये उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी लोकसभाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. महाजन यांनी इंदूरला भाजपचा बालेकिल्ला बनविले. १९८९ मध्ये त्यांनी ही जागा काँग्रेसचे दिग्गज नेते पी. सी. सेठी यांच्याकडून खेचून घेतली होती. नंतर जवळपास ३० वर्षे त्यांनी ही जागा सांभाळली.

काँग्रेसमध्येही होते मराठी नेतेकाँग्रेसमध्येही अनेक मराठी नेते होते. ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील माधवराव शिंदे हे त्यात प्रमुख होत. त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य हे आता भाजपात आहेत. माधवरावांच्या भगिनी यशोधरा राजे शिवराजसिंग मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होत्या. देवासच्या राजघराण्यातील तुकोराजीराव पवार हे भाजप सरकारमध्ये मंत्री होते. काँग्रेसचे डॉ. रघुनाथ पाप्रिकर हे ग्वाल्हेरचे महापौर होते.

दिल्लीकडून मराठी समुदायाला बाजूला सारले जात असताना समुदायातून आवाज उठताना दिसत नाही. आरएसएसमधील मराठी प्रभुत्वही कमी होताना दिसत आहे.अरुण दीक्षित, राजकीय विश्लेषक

मराठी संस्थानांचा प्रभावपूर्वीच्या मध्य प्रांतात इंदूर, ग्वाल्हेर, देवास आणि धार यांसारखी मराठी संस्थाने समाविष्ट होती. इंदूर, उज्जैन, बेतुल, ग्वाल्हेर, भिंड, विदिशा, सागर, जबलपूर, होशंगाबाद, धार आणि देवास या भागात मराठी लोकसंख्या एकवटली आहे. छत्तीसगडमध्येही मराठी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.

 

टॅग्स :madhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४marathiमराठीElectionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४