शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:27 IST

Pahalgam Terror Attack : खरे तर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारून आणि कलमा पढायला सांगून निष्पाप आणि निरपराध लोकांना मारल्याची घटना समोर आली होती.

काश्मीरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. यातच मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलाने वादग्रस्त पोस्टर लावले आहे. भापळमध्ये लावण्यात आलेल्या या पोस्टरवर, 'अब तो नाम पूछना पडेगा', असे लिहिण्यात आले आहे.

नेमकं काय आहे पोस्टरवर? -खरे तर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारून आणि कलमा पढायला सांगून निष्पाप आणि निरपराध लोकांना मारल्याची घटना समोर आली होती. या हल्ल्यात 26 जणांना त्यांचा धर्म विचारून आणि त्यांना कलमा न पढता आल्याने ममारण्यात आले. यामुळे भोपाळमध्येही संतापाची लाट आहे. भोपाळमध्ये जे पोस्टर लावण्यात आले आहे त्यावर, 'आदत डालिए नाम पूछने की..., बच्चों के सुरक्षित भविष्य के लिए... अब तो नाम पूछना ही पड़ेगा.' 

भोपाळमधील रस्ते आणि चौकात या पोस्टर्सच्या माध्यमाने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आक्रोश व्यक्त केला आहे. या पोस्टरवर करनाल येथील विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नीचा फोटो आहे. हा फोटो बघून संपूर्ण देश हळहळला होता. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांच्यावर गोळी झाडली होती. तेव्हा त्यांची पत्नी त्यांच्या शेजारी बसली होती. हाच फोटो विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आपल्या पोस्टरवर लावला आहे.

करण्यात आलं होतं भोपाळ बंदचं आवाहन -पहलगाम दहशतवादी हल्यानंतर  भोपालमध्ये 26 तारखेला निदर्शन करत भोपाल बंदचे आवाहन करण्यात आले आह. यानंतर, शनिवारी अर्धादिवस बाजार बंद होता. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादMadhya Pradeshमध्य प्रदेश