शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

MP Election 2023: मध्य प्रदेश सरकार महिलांच्या खात्यात १ रुपया का पाठवतेय? १० जूनला जमा होणार एक हजार रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 09:03 IST

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 'लाडली बहना' योजनेचं वर्णन शिवराज सिंह चौहान यांची गेम चेंजर योजना म्हणून केलं जातंय. यामुळेच सरकारला या योजनेत कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही. महिलांच्या खात्यावर १००० रुपये ट्रान्सफर करण्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी १० जूनपूर्वी त्यांच्या खात्यात प्रत्येकी एक रुपया टाकण्यात येतोय. राज्यातील लोकांना आकर्षित करण्यासाठी शिवराज सरकारनं लाडली बहना योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेंतर्गत पात्र महिलांकडून अर्ज भरून घेण्यात आले असून एक हजाराचा पहिला हप्ता १० जून रोजी त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.

ज्या महिलांनी अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांच्या खात्यात १० जून रोजी पैसे जमा करण्यासाठी सरकारनं काम सुरू केलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व महिलांची खाती आधारशी लिंक करण्यात आली असून एका क्लिकवर ही रक्कम या महिलांच्या खात्यात पोहोचते की नाही, याची चाचपणी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून बँकांमधून प्रत्येकी एक रुपया ट्रान्सफर केला जात आहे. ज्या महिलांच्या खात्यात हा एक रुपयाही पोहोचत नाही त्यामागचं कारणही शोधलं जात आहे. 

समस्यांचं निराकरणयासोबतच महिलांच्या खात्यात पैसे का पोहोचले नाहीत, हा प्रश्न देखील सोडवला जात आहे. कोणत्या महिलांच्या खात्यात एक रुपयाही जमा झाला नाही, याचा शोध घेतला जात आहे. ज्यांनी लाडली बहना या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांची १० जून रोजी निराशा होऊ नये यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत.

आधार लिंक नाहीलाडली बहना योजनेच्या पात्र महिलांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांची खाती आधारशी लिंक झालेली नाहीत. त्यांची एकापेक्षा अधिक बँकांमध्ये खाती आहेत, त्यामुळे सध्या काही अडचणी समोर येत आहेत. यामुळे रक्कम ट्रान्सफर करण्यात अडथळाही येऊ शकतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बँकांनीही कंबर कसली असून पात्र महिलांच्या खात्यात एक रुपया जमा केला जात आहे.

दोन कोटी महिला मतदारराज्यात पाच कोटी ४० लाख मतदार आहेत. यामध्ये महिलांची संख्या दोन कोटी ६० लाखांहून अधिक आहे. राज्यात लाडली बहना योजनेसाठी पात्र महिलांची संख्या एक कोटी २५ लाख आहे. राज्य सरकारनं २३ ते ६० वयोगटातील महिलांसाठी ही योजना लागू केली आहे. यासोबतच काही अटीही निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये महिलेच्या कुटुंबातील सदस्य केंद्रीय किंवा राज्य सरकारी सेवेत नसावेत, वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं, त्यांच्याकडे पाच एकरांपेक्षा अधिक जमीन नसावी आणि घरात कोणतीही चारचाकी नसावी, अशा प्रकारच्या अटी ठेवण्यात आल्यात.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान