शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

मेहुणीच्या लग्नाला गेलो नाहीतर घरी तांडवच; इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी अधिकाऱ्यानं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 22:34 IST

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे.

MP Assembly Election 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. आगामी निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. अशातच सरकारी अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक ड्युटी टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. भोपाळ जिल्हाधिकार्‍यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजेवर बंदी घातल्यानंतर अडीचशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी अर्ज केले आहेत. 

दरम्यान, ड्युटी रद्द करण्यामागे काहींनी आजारपणाचे तर काहींनी घरी लग्न असल्याचे कारण सांगितले. निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालय भोपाळ इथे आतापर्यंत दोनशेहून अधिक अर्ज आले आहेत. यातील बहुतांश अर्जांमध्ये आजारपणाचे कारण देत ड्युटी रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. तर, एका कर्मचाऱ्याने भन्नाट कारण सांगत ड्युटी रद्द करण्याची मागणी केली. 

इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी भन्नाट कारण जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी आदेशाची माहिती दिल्यानंतर कर्मचारी वर्गात खळबळ माजली. एका अधिकाऱ्याने अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अंकिता ढाकरे यांना निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी भन्नाट कारण सांगितले. "मेहुणीचे लग्न निवडणुकीच्या तारखेदिवशी आहे आणि त्यासाठी मला रजा हवी आहे", कर्मचाऱ्याची ही मागणी ऐकताच ढाकरे संतापल्या. लग्न सोडून निवडणूक ड्युटी करावी लागेल असे त्यांनी म्हणताच कर्मचाऱ्याने अनोखे कारण सांगितले. मेहुणीच्या लग्नाला गेलो नाहीतर घरी तांडवच होईल आणि जगणे कठीण होईल, असे त्याने सांगितले. कर्मचाऱ्याने दिलेला दाखला ऐकून अंकिता ढाकरे यांनी अधिकाऱ्याला त्याचा अर्ज घेऊन उपजिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यास सांगितले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूक