शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

मध्य प्रदेशात सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने; शिवराजसिंह चौहानांचा आत्मविश्वास दुणावला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 10:09 IST

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभांसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज मतमोजणी होत आहे. लोकसभा निवडणुकांना काही महिने बाकी असताना होत असलेल्या या निवडणुकांमध्ये नक्की कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजपला आव्हान देत काँग्रेसने ताकदीने निवडणूक लढवली होती. त्यामुळे या राज्यात सत्ताबदल होणार की भाजपला सत्ता राखण्यात यश येणार, याची उत्सुकता आहे. राज्यात आज सुरू असलेल्या मतमोजणीत सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रतिक्रिया देत भाजपला पूर्ण बहुमत मिळणार असल्याचा दावा केला आहे.

शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करताना म्हटलं आहे की, "भारत माता की  जय, जनता जनार्दन की जय... आज मध्य प्रदेशात मतमोजणी पार पडत असून मला विश्वास आहे की, जनतेच्या आशीर्वादाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वात भारतीय जनता पक्ष स्पष्ट बहुमताने पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे," अशी आशा चौहान यांनी व्यक्त केली आहे. तसंच त्यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

मध्य प्रदेशात काय आहे स्थिती?

मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागा असून स्पष्ट बहुमतासाठी ११६ जागांची आवश्यकता असते. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ११४ जागा मिळवत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. त्यानंतर काँग्रेसने सत्ता स्थापन करत कमलनाथ हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीही झाले. मात्र नंतर काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस सरकार अल्पमतात आलं आणि कमलनाथ यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राजीनामा दिलेल्या काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक झाली आणि शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपचं सरकार आलं.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!

दरम्यान, काँग्रेसने मागील चार वर्षांत राज्य सरकारचा भ्रष्टाचार तसेच शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांवरून सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. त्याआधारे राज्याची सत्ता आपल्याला काबीज करता येईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. दुसरीकडे, 'लाडली बहना'सारख्या जनतेला थेट लाभ देणाऱ्या योजना राबवत शिवराजसिंह चौहान यांनी लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला होता.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Madhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूकshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान