शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नुसती धावपळ! काेणी रॅली साेडली, तर काेणी दुसऱ्या वाहनाने गाठले कार्यालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 12:56 IST

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरच्या क्षणी पाेहाेचले अनेक उमेदवार

लोकमत न्यूज नेटवर्क, भाेपाळ: राज्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरच्या दिवशी काेणी शक्तिप्रदर्शन केले, तर काेणाची अखेरच्या क्षणापर्यंत धावपळ झाली. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे अशी स्थिती निर्माण झाली की, अनेक उमेदवार अगदी शेवटचे ५-१० मिनिटे असताना निवडणूक कार्यालयात पाेहाेचले. मुख्यमंत्री शिवराजसिंह चाैहान यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळची कमी गर्दीची वेळ निवडली. शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी बुदनी येथून अर्ज दाखल केला. भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांची मात्र फार दमछाक झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३ वाजेपर्यंत मुदत असते. विजयवर्गीय २ वाजून ५१ मिनिटांनी निवडणूक कार्यालयात पाेहाेचले. ते सकाळीच गणेश मंदिरात दर्शन घेऊन निघाले हाेते. परंतु, रॅलीमुळे त्यांना खूप उशीर झाला. हीच गत त्यांचे प्रतिस्पर्धी रमेश मेंदाेला यांची झाली. त्यांना रॅलीतील गाडी साेडून दुसऱ्या वाहनाने धावपळ करीत पाेहाेचावे लागले.

जितू पटवारी धावले

काॅंग्रेसचे जितू पटवारी यांनी राऊ येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयात जाताना ते  धावतच गेले. विलंब हाेत असल्यामुळे ते धावतपळत गेल्याचे बाेलले जात हाेते. मात्र, ते फिटनेससाठी धावत गेले. प्रचारातही धावत गेले.

भाजप उमेदवाराने भरलाच नाही अर्ज

बालाघाट मतदारसंघात अखेरच्या क्षणी चित्र पालटले आहे. भाजपने माैसम बिसेन यांना उमेदवारी जाहीर केली हाेती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाच नाही. अखेर त्यांचे पिता गाैरीशंकर यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केला. ऐनवेळी उमेदवार बदलल्यामुळे जाेरदार चर्चा सुरू आहे.

 

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान