शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

डिग्री परदेशात, प्रॅक्टिस करायचीय स्वदेशात, १,०६५ विद्यार्थ्यांचे वैद्यकीय परिषदेकडे अर्ज

By संतोष आंधळे | Updated: May 17, 2023 13:48 IST

...त्यानंतर वैद्यकीय परिषद परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर त्यांना उपलब्ध रुग्णालयात इंटर्नशिप करण्यासाठी परवानगी देतात. 

मुंबई : परदेशात वैद्यकीय पदवी शिक्षण घेतलेल्या १,०६५ भारतीय विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) यांच्याकडे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयांत, खासगी रुग्णालयांत इंटर्नशिप मिळावी म्हणून अर्ज केला आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने या विद्यार्थ्यांना राज्यातील ७४ रुग्णालयात इंटर्नशिप करण्याची परवानगी दिली असून, त्याची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने त्यांच्या गुणांनुसार त्यांना संबंधित रुग्णालयात इंटर्नशिपसाठी प्रवेश द्यावा, असे सूचित करण्यात आले आहे.काही कारणास्तव भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने असंख्य विद्यार्थी परदेशात वैद्यकीय शिक्षणाचे धडे गिरवतात. मात्र, अनेकांना मायदेशी परतून प्रॅक्टिस करायची असते वा पुढील शिक्षण घ्यावयाचे असते.

त्यासाठी परदेशातील वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना देशात स्क्रिनिंग टेस्ट द्यावी लागते. ही परीक्षा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनतर्फे घेतली जाते. ही परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थी त्यांनी ठरविलेल्या राज्याच्या वैद्यकीय परिषदेकडे इंटर्नशिपसाठी अर्ज करतात. त्यानंतर वैद्यकीय परिषद परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर त्यांना उपलब्ध रुग्णालयात इंटर्नशिप करण्यासाठी परवानगी देतात. 

...मगच मिळतो रुग्णसेवेचा परवाना- विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या रुग्णालयात एक वर्ष इंटर्नशिप पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला दिल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा रुग्णांना देऊ शकत असल्याचा परवाना मिळतो. ते विद्यार्थी मग राज्यात मेडिकल प्रॅक्टिस करू शकतात किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी तयारी करू शकतात. - देशभरातून परदेशातून शिकून आलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीच्या राज्यातील वैद्यकीय परिषदेला इंटर्नशिपसाठी अर्ज केलेला आहे. त्यात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला १,०६५ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.

 वैद्यकीय शिक्षणासाठी या देशांना पसंती - चीन, युक्रेन, रशिया, जॉर्जिया, फिलिपाइन्स, नेपाळ, कझाकस्तान, किरगिझस्तान, मॉरिशस

ज्या विद्यार्थांनी या इंटर्नशिपसाठी अर्ज केले आहेत त्यांना आम्ही त्यांच्या पसंतीनुसार रुग्णालयाची नावे दिलेल्या सॉफ्टवेअरमध्ये भरण्यास सांगणार आहोत. कारण यावेळी इंटर्नशिपसाठी मोठ्या संख्येने रुग्णालये उपलब्ध आहेत. त्याची यादी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने जाहीर केली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार त्या विद्यार्थ्यांना आम्ही इंटर्नशिपसाठी प्रवेश देऊ. येत्या दोन महिन्यांत किंवा त्यापेक्षा आधी ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.- वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद 

टॅग्स :Studentविद्यार्थीMedicalवैद्यकीय