शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीपूर्वी शिवराज सरकारची मोठी घोषणा, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 14:51 IST

थेट भरतीमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण मिळेल, असे सरकारने म्हटले आहे. 

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. यादरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने महिलांबाबत एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. मध्य प्रदेशातील सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. थेट भरतीमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण मिळेल, असे सरकारने म्हटले आहे. 

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या या घोषणेनंतर सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली असून, त्यानुसार वनविभाग वगळता सर्व विभागांमध्ये महिलांसाठी ३५ टक्के आरक्षणाचा फॉर्म्युला लागू होणार आहे. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने शिवराज सरकारचे हे आणखी एक मोठे पाऊल असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवराज सिंह चौहान सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी आणि आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी हा मोठा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत मध्य प्रदेशातील महिलांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये ३५ टक्के आरक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जाहीर केले होते की, सध्या पोलीस खात्यात फक्त ३० टक्के मुलींची भरती होते. आता ती ३५ टक्क्यांपर्यंत वाढवत आहे. उर्वरित सर्व नोकऱ्यांमध्ये ३५ टक्के भरती फक्त मुलींसाठीच असतील.

मुख्यमंत्री बुरहानपूर-बालाघाट दौऱ्यावरबुरहानपूरमधून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान लाडली बहन योजनेचा पाचवा हप्ता जारी करतील, ज्या अंतर्गत १ कोटी ३१ लाख भगिनींच्या खात्यात १५९७  कोटी रुपये हस्तांतरित केले जातील. बुरहानपूरच्या १ लाख ३३ हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडली बहन योजनेच्या लाभार्थ्यांना १२५० रुपये मिळणार आहेत. दरम्यान, निवडणूक आचारसंहितेमुळे भगिनींना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मुख्यमंत्री या योजनेची रक्कम सर्वप्रथम जारी करत आहेत. तसेच, मुख्यमंत्री बुरहानपूरमध्ये विविध योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानWomenमहिलाjobनोकरी