शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
2
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
3
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
5
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
6
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
7
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
8
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
9
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
10
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
11
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
12
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
13
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
14
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
15
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
16
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
17
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
18
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
19
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
20
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 

लेक्चर कॅन्सल झाल्याच्या आनंदापेक्षा मोठं काहीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:41 AM

माटुंग्याच्या रामनारायण रुईया कॉलेजमध्ये मी शिकले. इतर कॉलेजच्या तुलनेत तरुणाईत माझ्या कॉलेजची क्रेझ खूप पाहायला मिळते.

अपूर्वा परांजपे, अभिनेत्रीकॉलेजविषयी काय सांगशील?माटुंग्याच्या रामनारायण रुईया कॉलेजमध्ये मी शिकले. इतर कॉलेजच्या तुलनेत तरुणाईत माझ्या कॉलेजची क्रे झ खूप पाहायला मिळते. कॅम्पसपासून क्लासरूमपर्यंत प्रत्येक गोष्टीची वेगळी ओळख आहे. कल्चरल अ‍ॅक्टिव्हिटीमुळे मला बरंच काही शिकायला मिळालं.ते दिवस कसे होते?कधीच विसरता येणार नाहीत, असे हे दिवस आहेत. माझे बीएमएमचे शेवटचे सेमिस्टर बाकी आहे, पण कॉलेज संपल्यानंतर खूप मिस करेन. लेक्चर कॅन्सल झाल्याचा आनंद निदान आता तरी दुसºया कोणत्याही आनंदापेक्षा मोठा नसतो. प्रोजेक्ट देण्याची डेडलाइन म्हणजे मोठे टेन्शन, या दिवसांची आठवण नेहमी येत राहील.फ्रेंड्स ग्रुप कसा होता?सध्या कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे फ्रें ड्सशी भेटणं, बोलणं होतं, पण मध्यंतरी माझं मेमरी कार्ड चेक करताना, फर्स्ट ईअरपासूनच्या फ्रेंड्सची, इव्हेंट्सची, पिकनिकची माहिती आणि फोटो सापडले. काही वेळ का होईना, मी पुन्हा भूतकाळात रमले.नाटक-सीरियलमध्ये एंट्री कशी झाली?मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्यामुळे बालकलाकार म्हणून मी काम करायला लागले, पण रुईयामध्ये आल्यावर मी आणखी मनापासून अभिनयाचा विचार करू लागले. या कॉलेजमधून पासआउट झालेल्या अनेक मोठ्या कलाकारांची मनोगते वाचल्याने मला एक नवी प्रेरणा मिळाली. त्यामुळे मी माझ्या कॉलेजची नेहमी ऋणी राहीन.शिक्षकांविषयी काय सांगशील?नुकताच रिलीज झालेल्या ‘मेमरी कार्ड’ सिनेमाच्या शूटिंगसाठी मी बरेच दिवस बाहेर राहिल्याने, अभ्यासात पडलेला गॅप भरून काढण्यासाठी सगळ्याच शिक्षकांनी खूप मदत केली. प्रोजेक्ट सबमिशनच्या तारखा सांभाळून घेतल्या. माझ्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे.(मुलाखत - भक्ती सोमण)>लेक्चर बंक करून मजा करता का?आम्ही सगळेच कॉलेजच्या इतके प्रेमात आहोत की, लेक्चर बंक करूनसुद्धा कॉलेजमध्येच थांबतो. फेस्टचं काम, प्रॉजेक्ट एडिटिंग अशी कारणं सांगून क्लासरूममधून पळ काढला, तरी कॉलेजच्या बाहेर पाय टाकताना आपण सासरी जातोय की काय, अशीच फिलिंग येते. शेवटी रोज सायंकाळी कॉलेजचे वॉचमॅन आमची पाठवणी करतात.