शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

नखांची अशी घ्या काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 02:37 IST

आपण आपल्या बाह्य सौंदर्याविषयी सदैव जागरूक असतो. विशेषत: त्वचा, चेहरा, केसांची काळजी घेतो.

- अंजली भुजबळआपण आपल्या बाह्य सौंदर्याविषयी सदैव जागरूक असतो. विशेषत: त्वचा, चेहरा, केसांची काळजी घेतो. मात्र अनेक वेळा हात आणि हाताच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करतो. काही महिलांना लांब नखे ठेवण्यास आवडतात. त्यामुळे त्या महिला नेलपेन्ट, नेल आर्टचा उपयोग करु न आपल्या नखांचे सौंदर्य वाढवतात.मात्र घरातील काम करताना हे लांब वाढवलेली नखे तुटतात. यासाठी नखे मजबूत होणे गरजेचे असून नखांची काळजी घेणे अधिक आवश्यक आहे. यासाठी एक आठवड्यापेक्षा अधिक काळ नेलपेन्ट नखांवर ठेवू नका. नेलपेन्ट अधिक काळ नखांवर राहिली तर नखं खराब होतात.>नखांची स्वच्छतानखं जर वेळच्या वेळी कापली नाही तर ती घाण होतात. याचे अनेक दुष्परिणाम आहेत. बाहेरच्या वातावरणाचा सर्वात आधी नखांवर परिणाम होतो. त्यामुळे नखं घाण होतात. यामुळे नखं के वळ बाहेरु न नाही तर आतून देखील खराब होतात. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. यासाठी गरम पाणी आणि साबणाचे मिश्रण तयार करून त्यात दोन्ही हात बुडवून ठेवा काही वेळाने स्क्रबरच्या साहाय्याने स्वच्छ करा.अंड आणि दूधअंड आणि दूध आरोग्यासाठी उपयुक्त आहे त्याचप्रमाणे ते नखांसाठी उपयुक्त आहे. अंड्याच्या आतील पिवळा भाग दुधामध्ये मिसळून त्याचे मिश्रण नखांना लावा आणि याची काही वेळ मालीश करा. यामुळे नखं मजबूत तर होतील त्याचबरोबर चमकदार बनतील. चांगल्या नखांसाठी डायटमध्ये कॅल्शियम असणे गरजेचे आहे.आॅलिव्ह आॅइलआॅलिव्ह आॅइलमुळे के सांना फायदा होतो तसाच नखांना देखील होतो. एक चमचा आॅलिव्ह आॅइलमध्ये तीन ते चार चमचे लिंबाचा रस टाका आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी नखांना लावा, यामुळे नखं मजबूत होतात.नारळाचे तेलके सांप्रमाणेच नखांसाठी देखील नारळाचे तेल उपयुक्त आहे. नारळाचे तेल कोमट करु न नखांना मालीश के ल्यास नखं मजबूत होतात.ेसफरचंदाचा रस उपयुक्तएक चतुर्थांश सफरचंदाच्या रसामध्ये अर्धा कप बीअर आणि आॅलिव्ह आॅइल यांचे एकत्र मिश्रण तयार करा. आता या मिश्रणामध्ये दोन्ही हातांची नखे पाच मिनिटे बुडवून ठेवा आणि बाहेर काढून नंतर मालीश करा. आठवड्यातून दोन वेळा असे केल्यास नखं मजबूत होतात.>नखांना आकार देताना क्युटीकल (नखांच्या सुरुवातीची त्वचा)ची काळजी घेतली पाहिजे,अन्यथा ती त्वचा कापली जाण्याची शक्यता असते. नख कापताना ते एकाच बाजूने कापावे आणि शेप देखील एकाच बाजूने द्यावा, वेगवेगळ्या जागांवरून शेप दिल्यास नखं लवकर खराब होतात.रात्री कोल्ड क्रिमने नखांची मालीश के ली पाहिजे यामुळे नखांचे आरोग्य चांगले राहते. यामुळे नखं चमकदार बनतात. रात्री झोपेत नखं तुटण्याची भीती असते यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. लांब नखांच्या सुरक्षेसाठी बाजारात प्लास्टिकची कॅ प मिळते, त्याचा उपयोग तुम्ही नखांच्या सुरक्षेसाठी करु शकता.पायांचे सौंदर्य हे पायांच्या नखांवरच अवलंबून असते. पायाचा रंग गोरा आणि त्वचा मुलायम असेल आणि नखंच ओबडधोबड असतील तर निश्चितच पाय घाण दिसतात. यामुळे पायाची आणि नखांची स्वच्छता महत्त्वाची आहे यासाठी फू ट स्पा, पॅडिक्योर आणि घरगुती उपाययोजना के ल्या पाहिजेत.फू ट स्पा एक उत्तम पर्याय आहे. या प्रक्रियेत दोन्ही पाय हे बबलिंग स्पा मशिनमध्ये टाकले जातात. यामुळे पाय ब्रशच्या सहाय्याने स्वच्छ होतात. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि पाय मुलायम होतात.नखांवरील नेलपेन्ट काढण्यासाठी रिमूव्हरचा उपयोग करा यामुळे नखांवरील सर्व नेलपेन्ट निघून जाईल. त्याचबरोबर पॅडिक्युअर हा पर्याय पाय आणि नखे स्वच्छ करण्यासाठी उत्तम आहे. यामुळे नखांची देखील योग्य प्रकारे स्वच्छता होते.