शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

कोपरा न कोपरा खुलविणारे साइड टेबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 00:11 IST

या जागेचाही योग्य तो उपयोग करता येईल, म्हणजे या कोप-यांमध्ये साइड टेबल ठेवून आवश्यक ते सामान ठेवता येईल.

- रीना चव्हाणप्रत्येकाच्या घरात गरजेनुसार फर्निचर असते; पण बऱ्याचदा घरातील कोपरे तसेच राहतात. या जागेचाही योग्य तो उपयोग करता येईल, म्हणजे या कोप-यांमध्ये साइड टेबल ठेवून आवश्यक ते सामान ठेवता येईल. विविध आकारातील साइड टेबल मार्केटमध्ये सहज उपलब्ध असून आपल्या आवडीनुसार व जागेच्या अंदाजानुसार त्याचा वापर करता येईल. हॉल, किचन, बेडरूम, स्टडीरूम मध्येही आपल्या गरजेनुसार आपण हे टेबल ठेवू शकतो. चौकोनी टेबल एखाद्या बॉक्ससारखे असतात, त्यामध्ये आपल्या गरजेनुसार खणही करू शकता. जेणेकरून या टेबलावर फ्लॉवरपॉट, टेबल लॅम्प, घड्याळ ठेवू शकता आणि आतमध्ये पुस्तके, गरजेच्या छोट्या-छोट्या वस्तू ठेवता येतील. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टेबलावर काचही लावून घेऊ शकता. ट्रेच्या आकारात असलेला हा टेबल आपल्या गरजेनुसार बंद व उघडता येत असल्याने जास्त जागाही लागत नाही. दिसण्यासही आकर्षक असतात. पुस्तक ठेवण्याबरोबर चहा नाश्ता करण्यासाठीही तुम्ही याचा वापर करू शकता. गोल टेबलही इतर टेबलांसारखे दिसायला छान दिसतात. लाकडापासून बनविलेले गोल टेबल सर्रास बघायला मिळतात; पण आता प्लॅस्टिक, मेटलमध्येही ते सहज मिळतात. स्तंभाकार टेबलही चांगला पर्याय आहे. एकाच टेकूवरील हा टेबल दिसायलही छान दिसतो. हॉल नाहीतर बेडरूममध्ये तुम्ही यावर फोटोफ्रेम, टेलिफोन नाहीतर लॅम्पही ठेवू शकता. विशेषत: हॉलमध्ये एका कोपºयात या टेबलवर लॅम्प, फुलदानी नाहीतर टेबल कॅलेंडरही ठेवू शकता.>पा रंपरिक गोल, चौकोनी, आयाताकाराबरोबर आजकाल बदलत्या जीवनशैलीनुसार साइड टेबलमध्येही वेगळेपण दिसून येते. लाकडाबरोबर स्टील, लोखंडी, वेत, प्लावूड, काच अशा विविध प्रकारची आकर्षक साइड टेबल मार्केटमध्ये सहज मिळतात. काहींवर तर कोरीवर नक्षीकामसुद्धा केलेले असते. शेवटी प्रत्येकाच्या आवडीनुसार फर्निचरची जशी निवड केली जाते तशीच टेबलचीसुद्धा केली जाते. एवढेच नव्हे तर ते एकप्रकारे आपल्या फर्निचर मांडणीला पूर्णत्व देतात. साधारणत: वापरण्यात येणाºया साइड टेबल बाबत जाणून घेऊ या.