शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फुलांच्या सुगंधाने दरवळणार नात्यातील प्रेम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 04:52 IST

प्रत्येक दिवस तसा प्रेमाचाच; परंतु व्हॅलेंटाईन सप्ताहाचे एक वेगळेच महत्त्व आणि आकर्षण. आपल्या जोडीदाराला फूल दिल्यावर तर यात आणखीनच बहार येते.

पुणे : प्रत्येक दिवस तसा प्रेमाचाच; परंतु व्हॅलेंटाईन सप्ताहाचे एक वेगळेच महत्त्व आणि आकर्षण. आपल्या जोडीदाराला फूल दिल्यावर तर यात आणखीनच बहार येते. हाच फूल देण्याचा दिवस म्हणजे ‘रोझ डे’. व्हॅलेंटाईन सप्ताहाची सुरुवातही याच दिवसाने होते. या सप्ताहातील पहिला दिवस बुधवारी आहे. वर्षापासून हृदयात साठवून ठेवलेले प्रेम या दिवसाच्या निमित्ताने फुलांच्या सुगंधाने दरवळणार आहे. तशी तयारीही जिल्ह्यातील तरुणाईने केली आहे.>व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात : तरुणाईचा उत्साह शिगेलाप्रेमवीरांचा आवडता सप्ताह म्हणजे व्हॅलेंटाईन. या सप्ताहातील विविध सात दिवस तरुणाई आपल्या प्रिय व्यक्तीसोबत आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करते. आपल्या ‘प्रेमा’ची आठवण म्हणून अनेक जण फूल देतात. फुले मन जोडण्याचे काम करतात; म्हणून सप्ताहाची सुरुवात ‘रोझ डे’ने झाली. तरुणाईबरोबरच मोठे लोकही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. प्रत्येक गुलाब आपला वेगळा भाव आणि त्यातील ‘प्रेम’ प्रदर्शित करीत असतो. आपल्या-आपल्या पद्धतीने फुले निवडून व्हॅलेंटाईन सप्ताहातील पहिला ‘रोझ डे’ साजरा करण्यासाठी पुण्यामधील तरुणाई सज्ज झाली आहे.>रोझ डे : पूर्वीचा अनुभव पाहता, बाजारपेठेत लाल गुलाबाला अधिक मागणी असते. तरुणाईची मागणी पाहता, फूलविक्रेत्यांनीही गुलाबाची जास्त आवक केल्याचे समजते.पांढरा गुलाब : आयुष्यात कोणी तरी येणार, असा संदेश देतो. या रंगाचे गुलाबाचे फूल वडील आपल्या मुलीला आणि मुले आपल्या आईला देतात. हा रंग निर्मळ प्रेमाचे प्रतीक मानले जाते.लाल गुलाब : लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ हा संदेश लाल गुलाब देतो. हा रंग प्रेमाचा रंग मानला जातो. या रंगाचे गुलाब देऊन प्रियकर-प्रेयसी एकमेकांवरील प्रेम प्रकट करतात.पिवळा गुलाब : माझ्याशी मैत्री करशील काय? हे जणू हा गुलाब विचारतो. हा गुलाब मैत्रीचे संकेत देतो. यात आनंद सामावलेला असतो. हे फूल देणे म्हणजे ‘तू माझा जिवलग होतास, होतीस आणि कायमस्वरूपी राहशील.’ अनोळखी व्यक्तीला हा गुलाब दिलात तर ही मैत्रीची सुरुवात मानली जाते.गुलाबी गुलाब : हा रंग प्रतिष्ठेचे प्रतिनिधित्व करतो. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडत असेल तर त्याला हा गुलाब दिला जातो. ‘तू मला आवडतोस, आवडतेस’ हा संकेत हे गुलाब देते.>७ फेब्रुवारी : रोज डे : मन जोडणारे फूल!प्रियकर-प्रेयसीसाठी तसा प्रत्येकच दिवस प्रेमाचाच असतो; पण तरीदेखील व्हॅलेंटाईन डेचे एक वेगळे महत्त्व आहे. आपल्या जोडीदाराला या दिवशी फूल दिले तर मग काय बहार येते! प्रेमाची आठवण म्हणून या दिवशी फूल दिले जाते. फुले मन जोडतात. म्हणून तर एखाद्या रुग्णालाही भेटण्यासाठी जाताना फूलच का देतात? फूल देण्यामागचा अर्थ काय? यातून काय संदेश मिळतो? हे जाणून घेऊ आणि आपणही रंगीबेरंगी गुलाबांसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करू या.>८ फेब्रुवारी : प्रपोज डे : फर्स्ट इम्प्रेशन - लास्ट इम्प्रेशनकाय? तुम्हाला कुणाला प्रपोज करायचंय! मग 'व्हॅलेंटाइन डे'ची वाट बघताय? अरे हो, तो तर जागतिक प्रेम दिन! नाही का? तोपर्यंत थांबलात तर चला ठीक आहे; पण ती तोपर्यंत थांबली पाहिजे ना! अरे घाईघाईत कुठे चाललात? 'प्रपोज' करायला? अरे थांबा-थांबा, अभ्यास न करता कुठे देताय परीक्षा! तुम्ही म्हणत असाल, प्रपोज करण्यासाठी अभ्यासाची काय गरज? तुमचा हा अति उत्साह महागात पडू शकतो. प्रत्येक शब्द तोलूनमोलून वापरावा लागतो. गोंधळून चालत नाही. 'फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन' हे तत्त्व लक्षात ठेवा.>९ फेब्रुवारी : चॉकलेट डेकाही गोड होऊन जाऊ दे, कारण कोणतेही चांगले काम सुरू करण्यापूर्वी तोंड गोड केले पाहिजे. म्हणूनच ‘चॉकलेट डे’ साजरा केला जात असावा. चॉकलेट डे व्हॅलेंटाईन आठवड्याचा तिसरा दिवस असतो, जो प्रत्येक वर्षी ९ फेब्रुवारीला फारच जुनून आणि आनंदाने सर्व वयाचे लोक खास करून युवा, युगुले आणि मित्रांसोबत संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. चॉकलेट डे सर्वांचा आवडता दिवस असतो, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रियजन, मित्र, व्हॅलेंटाईन इत्यादींसोबत चॉकलेटचा डब्बा देणे आणि घेणे पसंत करते. या देशातील युवा एकमेकांना चॉकलेट देऊन हा दिवस साजरा करतात.>१० फेब्रुवारी : टेडी डेजोडपे आणि युवा व्हॅलेंटाईन आठवड्याच्या या सणाला फारच सुंदररीत्या साजरे करतात. या दिवशी लोक आपल्या आवडत्या लोकांना सुंदर टेडी गिफ्ट देऊन आपल्या प्रेमाची जाणीव करून देतात. आपल्या प्रेमाची जाणीव करून देणारा टेडी आपली बायको, पार्टनर, नवरा आणि इतर आवडीच्या लोकांना देऊ शकता. तसे तर मुलींना टेडी फार पसंत असतात आणि मुलांनादेखील लोक टेडी बिअर गिफ्ट देतात.>११ फेब्रुवारी : प्रॉमिस डेप्रेम नेहमी जबाबदारी आणि प्रामिसने केले जाते. यादिवशी एक नवीन प्रॉमिस करा आणि जुने प्रॉमिस पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. या दिवशी आपल्या पार्टनरला तेच प्रॉमिस करा जे तुम्ही पूर्ण करू शकता.>१२ फेब्रुवारीला : हग डेप्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे, याहून अधिक सुख काय असेल! त्याच्या कुशीत सर्व संसाराचे सुख, आनंद, विश्वास, अतूट बंधन आणि सुरक्षेची भावना मिळते.>१३ फेब्रुवारी : किस डेया दिवशी आपल्या जोडीदाराला किंवा ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता तिला किस करा; पण हो त्यासाठी माऊथ फ्रेशनर खाणे विसरू नका.>१४ फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन डेआता येतो एक स्पेशल दिवस, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीकडे आपले प्रेम प्रदर्शित करता. या दिवशी त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि प्रेमाच्या गोष्टी करा.