शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Rose Day 2018: जाणून घ्या गुलाबाचं फूल कसं बनलं प्रेमाचं प्रतीक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 12:56 IST

आज दुनियेत गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतीक मानलं जातं.

मुंबई- आज दुनियेत गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. व्हॅलेंटाइन्स विकची सुरूवात रोज डे पासून होते. शायरीमध्येही गुलाब व प्रेमाची सांगड घालून अनेक गोष्टी सांगितल्या जातात. 

कधीपासून बनलं गुलाब प्रेमाचं प्रतीकगुलाबाचं प्रेमसंबंधाशी खूप जून नातं आहे. ग्रीक आणि रोमन सभ्यतेत गुलाबाला प्रेमाची देवी एफ्रोडिटी आणि वीनसबरोबर जोडलं गेलं आहे.  देवांचं जेवण अमृत होतं. प्रेमाचे देवता क्यूपिड जेव्हा त्यांची आई देवी वीनससाठी अमृत घेऊन आले तेव्हा त्यांनी त्या अमृताचे काही थेंब त्या जागेवर शिंपडले. त्याच जागी पहिलं गुलाब उगवलं, अशी कथा सांगितली जाते. ज्या तीन फुलांचा उल्लेख बायबलात करण्यात आला आहे त्यामध्ये गुलाब फुलाचा सहभाग आहे. हिंदू धर्मात गुलाब आणि कमळ ही दोन फुलं आहेत ज्यांना खूप पसंती मिळाली. गुलाब फुलाला संस्कृतमध्ये पाटलम् म्हंटलं जातं. भगवान कृष्णाच्या पूजेसाठी विशेषकरून गुलाब वापरलं जातं. 

गुलाबाचा इतिहासगुलाब या फुलाला प्रेमाशी अडीच वर्षापासून जोडलं जातं. पण गुलाब या धर्तीवर खूप आधीपासून आहे. गुलाबाचं धरतीवरील अस्तित्व जवळपास साडे तीन करोड वर्षापासून आहे. 

कल्पनेपेक्षा जास्त प्रकाराचे आहेत गुलाबगुलाबाच्या शंभरहून अधिक विविध प्रजाती आहे. लाल गुलाब, सफेद गुलाबासाठी विविध कथा रचलेल्या आहेत. सगळ्यात मोठं गुलाब जवळपास 33 इंच म्हणजेच तीन फूट मोठं होतं. याचप्रकारे सगळ्यात लहान गुलाब तांदळाच्या दाण्याइतकं लहान होतं. दुनियेतील सगळ्यात जुनं गुलाबाचं झाड 1 हजार वर्ष जुनं आहे.

गुलाबाचा रंग कधीही काळा नसतो काळं गुलाबाचं फूल द्वेषाचं प्रतीक आहे असं अनेक जण मानतात. पण ज्याला आपण काळं गुलाब म्हणतो त्याचा रंग काळा अजिबात नाही. तो गडद लाल रंग आहे. हा गडद लाल रंग आपल्याला बघायला काळा वाटतो. 2009मध्ये जपानने पहिला नैसर्गिक निळं गुलाबाचं फूल बनवलं. आधी निळ्या गुलाबाचं उत्पादन होत नव्हतं. 

डोळे व पोटासाठी उपयुक्त गुलाबगुलाबाच्या फुलाचा वापर खाण्यासाठीही केला जातो. भारतात गुलाबाच्या फुलापासून गुलकंद बनविण्याची पद्धत आहे. याचप्रकारे युरोपात गुलाबापासून वाईन तयार केली जाते. गुलाबात विटॅमिन सी असतं. काही ठिकाणी गुलाबापासू जाम, लोणचं व इतर पदार्थ तयार केले जातात.  

टॅग्स :Valentine Day 2018व्हॅलेंटाईन डेValentine Weekव्हॅलेंटाईन वीक