शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सुंदरतेसोबतच मुलींनी या 7 गोष्टींनाही द्यावं प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 10:46 IST

आजच्या काळातील मुलींना आणखी काही गोष्टींना सिरीअसली घ्यायला हवं. या गोष्टींमुळे तुमचं जगणं आणखी चांगलं होईल. 

सुंदरता म्हटलं की मुली, मुली म्हटलं की सुंदरता हे समीकरण सर्वांनाच माहिती आहे. मुली सुंदर दिसण्यावर किती भर देतात हे सर्वांनाच माहिती आहे. त्यात गैरही काही नाहीये. पण त्यासोबतच आजच्या काळातील मुलींना आणखी काही गोष्टींना सिरीअसली घ्यायला हवं. या गोष्टींमुळे तुमचं जगणं आणखी चांगलं होईल. 

1) आर्थिक स्थैर्य - 

स्वत: गोष्टींसाठी स्वत: पैशांची बचत करा. याबाबत कुणावरही अवलंबून राहू नका. उगाच दहा वेळा तुम्हालाही कुणासमोर हात पसरावे लागणार नाही.

2) स्वप्नांचा पाठलाग -

समाजाने लादलेल्या बंधनांना झुगारुन आपली स्वप्न पूर्ण करण्यावर भर द्या. ते पूर्ण होणार नाहीत, असं स्वत:च ठरवून टाकण्याआधी निदान एकदा ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तरी करा. 

3) खड्ड्यात गेली तडजोड -

समाजाने महिलांवर अनेक अलिखीत बंधनं लादली आहे. त्यानुसार महिलांनाच नेहमी त्याग करावा लागतो. याला नाही त्याला नाही...प्रत्येक गोष्टीसाठी मुलींनाच नाही ऐकावं लागतं. पण आता बस्स...

4) आपलं  मत मांडा -

ब-याचदा मुली त्यांना काय वाटतं, त्यांचं एखाद्या गोष्टीवर काय मत आहे हे सांगतच नाहीत. पण तुम्हालाही स्वत:चं मत असलं पाहिजे. ते तुम्ही तितक्याच ताकदीने मांडलं पाहिजे. कारण तुम्हालाही तो आधिकार आहे. 

5) आत्मविश्वास वाढवा -

कोणत्याही गोष्टीसाठी आत्मविश्वास हा महत्वाचा ठरतो. त्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढवा. हे जरा कठिण काम आहे. पण अशक्य नक्कीच नाहीये. 

6) सकारात्मक विचार करा -

मी मुलगी आहे, त्यामुळे मी हे कसं करु शकणार असा विचार करु नका. मी काहीही करु शकते असा अॅटिट्यूड असू द्या. मोठा विचार करा.

7) स्वत:वर प्रेम करा -

बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही करालही. त्यासोबत आणखी एक महत्वाची बाब म्हणजे स्वत:वर प्रेम करा. जेव्हा तुम्ही स्वत:वर प्रेम कराल तरचं तुम्ही इतरही गोष्टी करु शकाल.

टॅग्स :Womenमहिला