शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गत हंगामात उडीद, मूग, सोयाबीनची हमीभाव केंद्रावर शून्य खरेदी

By हणमंत गायकवाड | Updated: August 16, 2023 19:23 IST

यंदाही उशिरा पाऊस पडल्याने उडीद-मुगाचा पेरा नगण्यच आहे.

लातूर : गतवर्षी हमीभावापेक्षा कमी भाव असल्याने हमीभाव केंद्रावर उडीद, मूग आणि सोयाबीन शून्य खरेदी झाली आहे.. मात्र, बाजारापेक्षा हरभऱ्याला हमीभाव केंद्रावर चांगला दर मिळाल्याने २ लाख ७२ हजार ८६७ क्विंटल हरभऱ्याची खरेदी हमीभाव खरेदी केंद्रांवर झाली आहे. १९ हजार ८९७ शेतकऱ्यांनी हरभरा हमीभाव केंद्रावर विकणे पसंत केले. त्यातून त्यांना १४५ कोटी ५७ लाख ४५ हजार ४४५ रुपये पेमेंट मिळाले आहे.

गतवर्षीही उडीद, मुगाचा पेरा कमी झाल्यामुळे हमीभाव केंद्रावर याची खरेदी होऊ शकली नाही. यंदाही उशिरा पाऊस पडल्याने उडीद-मुगाचा पेरा नगण्यच आहे. त्यामुळे हमीभाव केंद्राला उडीद, मूग मिळेल की नाही, याची शाश्वती कमी आहे. तर सोयाबीनचा बाजारभाव हमीभावापेक्षा थोडा जास्त मिळाल्याने शेतकऱ्यांनी मार्केट गाठले. या दोन कारणांमुळे हमीभाव केंद्रांवर उडीद, मूग आणि सोयाबीनची खरेदी होऊ शकली नाही.

म्हणून झाली हरभऱ्याचीच खरेदीहमीभाव केंद्रांवर बाजारभावापेक्षा हरभऱ्याला हमीभाव जास्त मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील १९ हजार ८७२ शेतकऱ्यांनी हमीभाव कें­द्रांवर हरभऱ्याची विक्री केली. २ लाख ७२ हजार ८६७ क्विंटल हमीभाव केंद्रावर हरभरा खरेदी केला. त्यातून शेतकऱ्यांना १४५ कोटी ५७ लाख ४५ हजार ४४५ रुपये पेमेंट करण्यात आले. आता पुढील हंगामाची वाट पाहत आहोत, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी सोमासे यांनी दिली.

पावसाने ताण दिल्याने चिंता वाढली...उडीद, मुगाचा हंगाम तर गेलाच. सोयाबीनवर शेतकऱ्यांची मदार आहे. परंतु, गेल्या १५ दिवसांपासून पावसाने ताण दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. गतवर्षी सोयाबीनला म्हणावा तसा भाव मिळाला नाही. यंदा तर निसर्गाचीच वक्रदृष्टी दिसत आहे. दुपारच्या सुमारास सोयाबीनच्या माना पडत आहेत. जोमात आलेले पीक कोमात येत आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर