याबाबत फाऊंडेशनचे संचालक संतोष पांचाळ म्हणाले, बीट्स फाऊंडेशन, पुणे ही संस्था गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला या विभागातील नवोदित कलावंतांना सक्षम व्यासपीठ, प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे. यंदाचा पुरस्कार लातूरचे सुपुत्र, युवा तबलावादक प्रा. गणेश बोरगावकर यांना जाहीर झाला आहे. प्रा. गणेश बोरगावकर यांना त्यांचे गुरू गोविंदराव बोरगावकर, सूरमणी पं. बाबूराव बोरगावकर, तालमणी प्राचार्य डॉ. राम बोरगावकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल गुरु पं. संजू सहायजी, गुरुवर्य पं. नयन घोष, प्रा. लक्ष्मण श्रीमंगले, प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. शिवराज मोटेगावकर, तुकाराम पाटील, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, प्रा. विवेक ढगे, प्राचार्य बाबुराव जाधव, प्रा. नीलेश राजमाने आदींनी गणेश बोरगावकर यांचे कौतुक केले आहे.
तबलावादक गणेश बोरगावकर यांना ‘युवा कला गौरव’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:22 IST