शिरुर ताजबंद येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित सर्वरोगनिदान, औषधोपचार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सावित्रा पडोळे होत्या. यावेळी जि. प.चे गटनेते मंचकराव पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, पं. स. सदस्य सुशिला भातीकरे, तालुकाध्यक्ष शिवाजी देशमुख, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे, डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. सुरजमल सिहांते, जि. प. सदस्य माधव जाधव, दीपक भराटे, प्रशांत पाटील, डॉ. नारायण जाधव, डॉ. नामदेव बनसोडे, डॉ. उषा काळे, डॉ. मंगेश मुंडे, डॉ. राजेंद्र गुणाले, डॉ. सचिन पाटील, डॉ. दीपक भद्रे, डॉ. प्रशांत बिराजदार, डॉ. सुनीता पाटील, डॉ. ओम चिट्टे, डॉ. योगेश पाटील, आदींची उपस्थिती होती.
आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, जयंती उत्सव साजरी करताना समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. समाजात महापुरुषांचे विचार रुजविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे समाजाचा विकास होण्यास मदत होते.
यावेळी वनस्पतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. शिबिरात एकूण ५४८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. १५ जणांनी रक्तदान केले. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ३८ रुग्णांना पाठविण्यात आले.
सूत्रसंचालन नुरखाँ पठाण व मंगेश बिडवे यांनी केले. डॉ. दत्ता पाटील यांनी प्रास्ताविक केले. संयोजक तथा सिध्दी शुगरचे संचालक सूरज पाटील यांनी आभार मानले.