अहमदपूर : तालुक्यातील रुद्धा येथील बालाघाट तंत्रनिकेतन महाविद्यालयात योग शिबिर घेण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. नितीन शिवपुजे यांनी योगाचे महत्त्व सांगितले. प्राचीन काळापासून ऋषी-मुनी, साधू- संतांनी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज सांगितली आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो, शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सकारात्मक राहणे आणि इम्युनिटी वाढविणे गरजेचे आहे, असेही प्राचार्य डॉ. शिवपुजे म्हणाले. यावेळी उपप्राचार्य स्वप्निल नागरगोजे, प्रा. संतोष लातुरे, प्रा. सुहास दहिटणकर, प्रा. कालिदास पिटाळे, प्रा. महेश स्वामी, प्रा. आरती पुणे, प्रा. श्रुती मेनकुदळे, व्ही. एच. कुलकर्णी, कैलास होनमाने, सतीश केंद्रे आदी उपस्थित होते.
योग साधनेतून आबालवृद्धांनी घेतला तंदुरुस्तीचा मंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST