शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर, पुण्याच्या मल्लांचा बोलबाला

By हरी मोकाशे | Updated: March 10, 2024 18:55 IST

तालुका क्रीडा संकुलात ही कुस्ती स्पर्धा सुरू आहे.

उदगीर (लातूर): उदगीरात सुरू असलेल्या खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा रणजित पाटील, पुणे जिल्ह्याचा निखिल कदम व पुणे शहरचा साकेत यादव या मल्लांनी प्री स्टाईल प्रकारात आपापल्या वजनी गटात बाजी मारून सुवर्णपदक पटकाविले. ग्रीको रोमन प्रकारात कोल्हापूरचा वैभव पाटील व नितीन कांबळे तसेच पुणे जिल्ह्याचा दिग्विजय भोंडवे यांनी आपापल्या गटात वर्चस्व गाजवित सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. स्पर्धेत कोल्हापूर आणि पुण्याच्या मल्लांचा बोलबाला पहायला मिळाला.

येथील तालुका क्रीडा संकुलात ही कुस्ती स्पर्धा सुरू आहे. रविवारच्या धावत्या दौऱ्यात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे दुसऱ्या दिवशीच्या कुस्ती स्पर्धा नियोजनाचा आढावा घेतला. प्री स्टाईल प्रकारातील ५७ किलो वजनी गटात गतविजेत्या कोल्हापूरच्या रणजित पाटील यंदाही निर्विवाद वर्चस्व गाजवित दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने अंतिम लढतीत लातूरच्या आकाश गदेला १०-० गुण फरकांनी लोळवले. आकाशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या गटात अहमदनगरचा ओम वाघ व सांगलीचा निनाद बडरे कांस्यपदकाचे मानकरी ठरले. ७० किलो वजनी गटात पुणे जिल्ह्याच्या निखिल कदमने कोल्हापूरच्या निलेश हिरूगडेचा ३-० गुण फरकाने पाडाव करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. निलेशला रौप्यपदक मिळाले, तर कोल्हापूरचा अनुप पाटील व साताऱ्याचा ओंकार फडतरे यांनी कांस्यपदक जिंकले. ९७ किलो वजनी गटात पुणे शहरचा साकेत यादव सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. कोल्हापूरच्या शशिकांत बांगरला रौप्यपदक, सोलापूरचा लक्ष्मण पाटील व सातारचा अजय थोरात यांना कांस्यपदके मिळाली.

सांगलीच्या प्रतिक्षा बागडीला सलग दुसरे सुवर्ण...डबल महाराष्ट्र केसरी व एक वेळची राष्ट्रीय पदकविजेती सांगलीची प्रतिक्षा बागडी हिने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत खाशाबा जाधव चषक महिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ७६ किलो गटात सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक जिंकले. कोल्हापूरच्या वेदिका सासणेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुण्याची सिद्धी शिंदे व कोल्हापूरची अंकिता फातले कांस्यपदकाच्या मानकरी ठरल्या. ५९ किलो गटात पुणे शहरची कल्याणी गदेकर सुवर्णपदकाची मानकरी ठरली. पुणे जिल्ह्याच्या आकांक्षा नलावडेला रौप्यपदक, तर कोल्हापूरच्या सृष्टी भोसलेला कांस्यपदक मिळाले. ५० किलो गटात पुणे शहरची ज्ञानेश्वरी पायगुडे व कोल्हापूरची आर्या पाटील यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. कोल्हापूरची प्रमिला पवार व अहमदनगरची आयशा शेख यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

टॅग्स :laturलातूरWrestlingकुस्ती