महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघाच्या जळकोट तालुका शाखेच्या वतीने गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांना तालुकाध्यक्ष सुधाकर सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. मनरेगा अंतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सेवकांची विविध देयके प्रलंबित असल्याने ती अदा करण्यात यावीत. यासंदर्भात तालुका व जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केलेला आहे. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नाही. प्रलंबित मानधन तत्काळ देण्यात यावे. प्रलंबित प्रवास भत्ता व अल्पोपहार भत्ता देण्यात यावा. सादिल खर्च मंजूर करावा. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवकांसाठी फर्निचर उपलब्ध करुन द्यावे आदी मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
निवेदनावर तालुकाध्यक्ष सुधाकर सोनकांबळे, शादुल शेख, राजेंद्र वाघमारे, परमेश्वर पाटील, रामचंद्र गायकवाड, श्याम हुंजे, तुकाराम घोडके, राजकुमार काळे, धनाजी दहिफळे, रामदास केंद्रे, संजय गोंटे, पी.बी. जोगपेटे, गजानन मोरे, व्यंकटेश शिंदे, पटेल, वसंत चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.