शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचे सरासरीपेक्षा चारपट अधिक उत्पन्न घेणाऱ्या महिला शेतकरी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2023 18:02 IST

उदगीर तालुक्यातील राज्यस्तरीय तूर पीक स्पर्धेत रावणगावच्या जयश्री डोणगापुरे प्रथम

उदगीर: राज्याच्या कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खरीप तूर पिकाच्या स्पर्धेत रावणगाव (ता. उदगीर)येथील जयश्री भीमराव डोणगापुरे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

राज्यात कृषी विभागाने गेल्यावर्षी खरीप हंगामात पीक स्पर्धा राबवली होती. या स्पर्धेत मराठवाड्यातील महिला शेतकरी जयश्री भीमराव डोणगापुरे (रावणगाव ता. उदगीर)यांनी तूर पिकात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या चार पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समितीने हा निकाल जाहीर केला आहे. 

खरिपाच्या पीक स्पर्धेत एकमेव या महिला शेतकरी जयश्री डोणगापुरे  पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या आहेत.५० हजार रुपये रोख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे,  देवर्जनचे मंडळ कृषी अधिकारी सुनील देवनाळे, कृषी सहाय्यक व्यंकट वाघमारे,  नरसिंग बुगडे यांचे  जयश्री डोणगापुरे यांना मार्गदर्शन लाभले. त्यांनी  तूर जात राजेश्वरी  बियाणांची लागवड अंतर ९फुटावर ,दोन ओळी दोन रोपांतील अंतर  १०इंचाच्या बेडवर  टोकण पध्दतीने केली होती.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीlaturलातूर