शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पोलिसांना धारेवर धरत महिलांनी दारू विक्रेत्यांना दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 15:00 IST

महिलांनी पुढाकार घेत पोलिसांना धारेवर धरले आहे़

ठळक मुद्दे पोलिसांना जाब विचारला कायमस्वरूपी बंदीसाठी ग्रामस्थांचा रोको

बेलकुंड/ उजनी (जि़ लातूर) : औसा तालुक्यातील तावशी ताड येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पोलिसांना वारंवार निवेदने देऊनही कारवाई होत नसल्याने गावातील संतप्त महिलांनी गुरूवारी सकाळी दारूविक्रेत्यांना पकडून डांबून ठेवले़ पोलिसांना कळवूनही ते लवकर आले नसल्याने विक्रेत्यांना मारहाण करण्यात आली़ त्यानंतर संतप्त महिलांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला़

तावशीताड येथे सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ठोक दारूविक्री करणारा एक विक्रेता आला़ यावेळी महिलांनी त्याला हटकले असता त्याच्याकडे दारूच्या बाटल्या होत्या़ त्यामुळे त्याला ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवले़  भादा पोलीस ठाण्याला याबाबतची माहिती देऊन सकाळी ११ वाजेपर्यंत पोलीस आले नसल्याने संतप्त महिलांनी रास्ता रोको करीत दारूविक्रेत्याला मारहाण केली़ त्यानंतर घटनास्थळी भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार आपल्या तीन सहकाऱ्यांसह गावात आले़ यावेळी ग्रामस्थांनी जाब विचारला असता वाद उद्भवला़ औसा पोलीसही घटनास्थळी पोहचले़ संतप्त महिलांची समजूत काढत गावातील जवळपास ४ ते ५ दारूविक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आले़ 

जवळपास २ ते अडीच हजार लोकसंख्या असलेल्या गावात गेल्या अनेक वर्षांपासून अनाधिकृतपणे जवळपास ८ ते १० जण दारूविक्रीचा व्यवसाय करतात़ त्यामुळे गावातील तरूण व्यसनाधीन झाले आहेत़ अनेकांचा संसारही दारूमुळे उध्वस्त झाला आहे़ महिलांसह ग्रामस्थांनी दारू बंद करावी, ंयासाठी अनेकदा पोलीस अधीक्षक, उपाधीक्षकांसह भादा पोलिसांकडे गेले़ मात्र यावर किरकोळ कारवाई झाली़ वारंवार तक्रार करूनही दारूबंंदी होत नसल्याने ग्रामस्थ संतापले आहेत़ विशेष म्हणजे, महिलांनी पुढाकार घेत पोलिसांना धारेवर धरले आहे़

टॅग्स :laturलातूरalcohol prohibition actदारुबंदी कायदाPoliceपोलिस