शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

औसा नगरपालिकेला शंभर कोटी देणार; कामे दर्जेदार करा, निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 18:57 IST

Ajit Pawar : कोविडमुळे राज्याचे अर्थचक्र मंदावले आहे. अजूनही हे संकट टळले नसून, जनतेने जबाबदारीने वागावे, संकटाचा मुकाबला करणे ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी असून, यात राजकारण करु नका

औसा (जि.लातूर) : शहरातील विकासाची कामे दर्जेदार झाली पाहिजेत तसेच वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. विकास कामासाठी येणारा पैसा हा जनतेच्या कष्टातून येतो याचा विसर पडू देऊ नका. औशाच्या विकासासाठी शंभर कोटीचा निधी देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी येथे दिले.

औसा येथील नगरपालिकेच्या विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मंचावर राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, माजी आ. विलास लांडे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, संजय शेटे, सुरज चव्हाण, आशाताई भिसे, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महमदखाॕ खान पठाण, मुख्याधिकारी वसुधा फड, उपनगराध्यक्ष कीर्ती कांबळे, तालुकाध्यक्ष सुभाष पवार यांची उपस्थिती होती. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही लोक उघड्यावर शौचास बसतात. ही लाजिरवाणी बाब आहे. स्वच्छता अभियानामध्ये एकदाच पारितोषिक मिळवून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. यासाठी जनतेने ही आपली जबाबदारी पार पाडावी. कोविडमुळे राज्याचे अर्थचक्र मंदावले आहे. अजूनही हे संकट टळले नसून, जनतेने जबाबदारीने वागावे, संकटाचा मुकाबला करणे ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी असून, यात राजकारण करु नका, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेला प्रत्येकी ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याची योजना सरकारच्या विचाराधीन आहे. प्रास्ताविकात नगराध्यक्ष डॉ. शेख म्हणाले, शहर विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरघोस निधी उपलब्ध करुन दिला. कामे मार्गी लावण्यासाठी पाठबळ दिले. शहर विकासाचे श्रेय सर्वाधिक त्यांनाच आहे.

भरघोस निधी देऊ...आगामी निवडणुकीत डॉ. अफसर शेख यांच्या नेतृत्वाखाली टीमला पुन्हा संधी द्या. शहराच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिले. नगराध्यक्ष डॉ. शेख शहराच्या विकासासाठी झपाटलेला माणूस आहे. शहरातील भुयारी गटार योजना, नवीन वस्तीमध्ये पाणी वितरण व्यवस्था, रस्ता रुंदीकरणाचा तिसरा टप्पा अशा विविध विकास कामासाठी निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या प्रकल्पांचे झाले उद्घाटन...औसा शहरात नगरपालिकेने उभारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र, व्यापारी संकुल, सांस्कृतिक सभागृह, किल्ला मैदान ते नगरपरिषद कार्यालय मुख्य रस्ता, ऊर्जा प्रकल्प, कर्मचारी निवासस्थान, आठवडी बाजार विकसित करणे आदी विविध विकास कामांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारlaturलातूर