येथील कान, नाक, घसा तज्ज्ञ डाॅ. संजय कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात माहिती पत्रकाच्या प्रकाशनात ते बाेलत होते. यावेळी बालरोग व मेंदूविकार तज्ज्ञ डाॅ. रसिका भारस्वाडकर, उदगीर आयएमएचे अध्यक्ष डाॅ. बाळासाहेब पाटील, धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. दत्तात्रय पाटील, डाॅ. धनाजी कुमठेकर, डाॅ. गोविंद सोनकांबळे, डाॅ. प्रदीप जटाळे, डाॅ. सुनील बनशेळकीकर, साक्षी कुलकर्णी, बालाजी मुर्के, सतीश कुलकर्णी, कुमार स्वामी, गोपाळ बिरादार, संतोषी हलकट्टे, अभिजित बनसोडे उपस्थित होते.
डॉ. भारस्वाडकर म्हणाले, मोबाईलचा अतिवापर आणि जागोजागी तुंबणारी रहदारी ही चिंतेची बाब आहे. पूर्वी ध्वनिप्रदूषण केवळ औद्योगिक स्वरूपाचे होते पण अलीकडच्या काळात औद्योगिक साधनांव्यतिरिक्त इतर कारणांनी होणाऱ्या ध्वनिप्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. प्रत्येकाने जागरूकपणे आणि जबाबदारपणे वागणे जरूरी असल्याचे डाॅ. संजय कुलकर्णी म्हणाले. सूत्रसंचालन डाॅ. तुषार वनसागर यांनी केले. आभार डाॅ. दीपाली कुलकर्णी यांनी मानले.