शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या दिवसात संपूर्ण येरोळ गाव चाचपडतोय अंधारात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST

लाईट व्यवस्थित न दिल्यास येथील महावितरणच्या उपकेंद्रास टाळे लावले जाईल असा इशारा उपसरपंच सतीश सिंदाळकर व ग्रामस्थांनी दिला आहे. ...

लाईट व्यवस्थित न दिल्यास येथील महावितरणच्या उपकेंद्रास टाळे लावले जाईल असा इशारा उपसरपंच सतीश सिंदाळकर व ग्रामस्थांनी दिला आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे आहे. पण महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे वीज वारंवार खंडित होत असल्याचे प्रकार घडत आहेत. पिण्याचे पाणी मिळणेही मुश्कील झाले आहे. तसेच वेगवेगळे उद्योग असणाऱ्या दुकानदार व व्यावसायिकांचीही अडचण झाली आहे. एकूणच, सर्व कामकाजावर विपरीत परिणाम होत आहेत. महावितरण अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकांसमोर मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत.

उपकेंद्रात कायमस्वरूपी अधिकारी व लाईनमन नसल्यामुळे हे उपकेंद्र समस्यांचे माहेरघर बनले आहे. प्रभारी अधिकाऱ्यावर कामकाज सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी या गावाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. त्वरित गावातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असे भाजपाचे तालुकाध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले.

आमच्या उद्योगावर परिणाम होत आहे. ऐन पावसाळ्यात नागरिक व व्यावसायिकांना त्रासास सामोरे जावे लागत असल्याने महावितरणने ही समस्या सोडवणे गरजेचे आहे. - विश्वनाथ नल्ले

नवीन ट्राॅन्सफाॅर्मर बसविणार...

येरोळ येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त लोड येत असल्याने वारंवार ट्रान्सफार्मर जळत आहेत. नवीन ट्राॅन्सफाॅर्मर बसविण्यात येत असून सुरळीत वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचे कनिष्ठ अभियंता जी.एस. गिरी यांनी सांगितले.