शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
2
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
3
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
4
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
5
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
6
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
7
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
8
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
9
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
10
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
11
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
12
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
13
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
14
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
15
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
16
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
17
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
18
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
19
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
20
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

बांधकाम साहित्य महागल्याने सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:17 IST

लातूर : गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत बांधकाम साहित्यांच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर घेण्याचे किंवा ...

लातूर : गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत बांधकाम साहित्यांच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर घेण्याचे किंवा नवीन घराचे बांधकाम करण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाळू, सिमेंट, खडी, स्टील, विटा आदी साहित्यांच्या किमतीत वाढ झाली असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्लॉट घेऊन बांधकाम करणाऱ्यांना तर महागाईमुळे बांधकाम बंद ठेवावे लागत असल्याचे चित्र आहे.

शहरापासून दूर घरे स्वस्त, पण जाणे-येणे महाग...

लातूर शहरापासून जवळच असलेल्या नवीन वसाहती परिसरात रो-हाऊस, फ्लॅटची बांधकामे सुरू आहेत. शहरापासून दूर शहराच्या तुलनेत स्वस्त आहेत. मात्र, अप-डाऊन करण्यासाठी गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.

शहरात शाळा, महाविद्यालये जवळ असल्याने अनेकांनी मुलांच्या सोयीसाठी शहरातच राहणे पसंत केले आहे. शहराच्या बाहेर घर घेतल्यास शाळा, महाविद्यालयात येण्याची सोय नसल्याचेही अनेकांचे मत आहे.

कोरोनाच्या काळात शहराबाहेर अनेक बांधकामाची साईट सुरू झाल्या आहेत. मात्र, अनेकांच्या व्यवसायाला कोरोनाचा फटका बसला असल्याने नवीन घरे विक्री होण्यास काही दिवसांची वाट पहावी लागणार आहे.

बँकाचे गृहकर्ज झाले स्वस्त...

स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, एचडीएफसी बँक, सहकारी बँकाच्या वतीने घर खरेदीसाठी विविध आकर्षक सवलती दिल्या जात आहे. मात्र, कोरोनामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गृहकर्ज स्वस्त झाले असले तरी ते घेण्यास नोकरदारांचा प्रतिसाद कमीच आहे.

बांधकाम साहित्यात स्वस्ताई नाहीच...

साहित्य २०१८ २०१९ २०२० २०२१

सिमेंट २९० ३०० ३२० ३८०

विटा ४१०० ४२०० ४५०० ८०००

वाळू २८००० ३०००० ३५००० ५०,०००

खडी २३०० २५०० २७०० ३५००

स्टील ४१०० ४३०० ४५०० ५,७००

साहित्य विक्रेते म्हणतात...

गेल्या वर्षभरात बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यातच कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. दिवाळी, दसरा, अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर अनेकजण नवीन बांधकाम सुरू करीत असत. मात्र, वाढत्या दरामुळे ग्राहकांचा प्रतिसाद मंदावला आहे. - सिद्धेश्वर बिराजदार

दरवर्षी बांधकाम साहित्याची विक्रीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळायचा. मात्र, कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाल्याने नवीन बांधकामे अत्यल्प सुरू आहेत. परिणामी, साहित्य विक्रेत्यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. दोन वर्षांच्या तुलनेत बांधकाम साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. - फरहान सौदागर

घर घेणे कठीणच...

कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. जमा पैशांमधून घर घेण्याचे स्वप्न होते. परंतु, बांधकाम साहित्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे घर घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे महागाई कमी कधी होईल याची प्रतीक्षा आहे. महागाई कमी झाल्यास घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. - बालाराम शर्मा

नवीन घर घेण्याचेब ठरविले होते. त्यानुसार आर्थिक नियोजनही केले होते. मात्र, कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. महागाईमुळे बजेट कोलमडले असून, नवीन घर घेण्याचे सध्यातरी स्थगित केले आहे. या महागाईच्या स्थितीत घर घेणे अवघड ठरत आहे. त्यामुळे नवीन घर घेण्याचे नियोजन पुढे ढकलले आहे. - अविनाश रामढवे