शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धरणात पाणी कमी असताना ‘मांजरा’ला पाणीपट्टीतून मिळाले पाच कोटी सत्तावन्न लाख

By हणमंत गायकवाड | Updated: April 1, 2024 19:35 IST

लातूर मनपाकडून १ कोटी ५२ लाख तर एमआयडीसीकडून तीन कोटी ४४ लाख

लातूर: मांजरा प्रकल्पात यंदा पाणीसाठा कमी असला तरी पाणीपट्टीची वसुली मोठ्या प्रमाणात झाली आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली झाल्याने लातूर पाटबंधारे विभागाला दिलासा मिळाला आहे. मांजरा प्रकल्पावरील बिगर सिंचन अर्थात पाणीपट्टीतून पाच कोटी ५७ लाख ७७ हजार १३० रुपये मिळाले आहेत. मांजरा प्रकल्पाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणीपट्टीची एवढी मोठी वसुली झाली आहे.

लातूर महानगरपालिकेने  १ कोटी ५२ लाख ७७ हजार ५५८ रुपये पाणीपट्टीचे भरले आहेत. तर महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ लातूरने ३ कोटी ४४ लाख २० हजार ६५४ रुपये पाणीपट्टीचे पाटबंधारे विभागाकडे भरले आहेत.  लातूरच्या या दोन संस्थांकडून सर्वाधिक पाणीपट्टी पाटबंधारे विभागाच्या मांजरा प्रकल्पाला मिळाली आहे. विशेष म्हणजे यंदा धरणात कमी पाणी साठा असताना बिगर सिंचनातून  पाटबंधारे विभागाला पाणीपट्टी पोटी रक्कम मिळाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निहाय मिळालेली पाणीपट्टी....लातूर महानगरपालिका : १कोटी ५२ लाख ७७ हजार ५५८महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ लातूर : ३ कोटी ४४ लाख २० हजार ६५४अंबाजोगाई नगरपालिका : २४ लाख ८७ हजार १२२कळंब नगर परिषद : ९ लाख रुपयेकेज धारूर १२ गावे पाणीपुरवठा योजना :  ६ लाख रुपये

पाणीपट्टी भरण्यासाठी संस्थांचा प्रतिसाद...मांजरा प्रकल्पावरील आठ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ५ कोटी ५७ लाख ७७ हजार १३०  रुपयाची वसुली पाणीपट्टीतून झाली आहे. ही रक्कम पाटबंधारे विकास महामंडळाकडे जमा होते. त्यातील काही रक्कम प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मिळते. गतवर्षी चार कोटीच्या आसपास मांजरा प्रकल्पातून पाणीपट्टीची वसुली झाली होती. यंदा साडेपाच कोटी वसुली झाल्याने लातूर पाटबंधारे विभागाला दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणlaturलातूर