राजकुमार जाेंधळे / लातूर : काेराेना काळात साथराेग प्रतिबंधक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ५१८ नागरिकांवर जिल्ह्यातील त्या-त्या पाेलीस ठाण्यांत कलम १८८ भादंवि अन्वये दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, २ हजार ३१४ वाहने जप्त करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई लातूर जिल्हा पाेलीस प्रशानाच्या वतीने गत सहा महिन्यांत करण्यात आली आहे.
काेराेना महामारीला राेखण्यासाठी मार्च २०२० पासून टप्प्याटप्प्याने विविध नियम आणि निर्बंध राज्य शासन, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आले असून, या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पाेलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तैनात आहेत. काेराेना काळात प्रसार आणि गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लाॅकडाउन आणि संचारबंदी जारी करण्यात आली हाेती. दरम्यान, संचारबंदी काळात गर्दी हाेणार नाही यासाठी कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रमुख मार्गावर नाकाबंदी करण्यात आली हाेती. लातूर शहरातील विविध चाैकातही पाेलीस फाैजफाटा तैनात करण्यात आला हाेता. काेराेना काळात कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या तब्ब्ल २ हजार ३१४ चालकावंर वाहन जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
कलम १८८ काय आहे?
१८९७ साथराेग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार या काळात काही नियम लागू हाेतात. शासनाने निर्देशित केलेले सरकारी अधिकारी वेगवेगळे आदेश देऊ शकतात. या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तीविराेधात कलम १८८ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येताे. विशेष म्हणजे कायदा माेडणाऱ्या व्यक्तीकडून जीवित अथवा वित्तहानी झाली पाहिजे, असे नाही. नियमांचे उल्लंघन करणारा व्यक्ती हा गुन्हा दाखल करण्यासाठी पात्र ठरताे.
काय हाेऊ शकते शिक्षा?
कायद्यातील तरतुदीनुसार फक्त आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस एक महिन्याचा कारावास किंवा २०० रुपयांचा दंड अथवा दाेन्ही शिक्षा हाेऊ शकते. दुसऱ्या तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केले आणि त्यातून मानवी जीवन वा आराेग्य धाेक्यात आले तर त्या व्यक्तीला सहा महिन्यांचा कारावास किंवा एक हजार रुपयांचा दंड अथवा दाेन्ही शिक्षा मिळू शकतात.
नागरिकांनी कायद्याचे
पालन करण्याची गरज...
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या नियमांचे, कायद्याचे उल्लंघन हाेणार नाही. याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेण्याची गरज आहे. साथराेग प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल हाेणारे हे गुन्हे अदखलपात्र आहेत. कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पाेलीस प्रशासन प्रयत्नशील असते. नियम माेडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई हाेणार आहे. यासाठी प्रत्येकाने जारी केलेल्या नियम, निर्बंध आणि कायद्याचे उल्लंघन करू नये.
- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर.