शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३५०० आशा गटप्रवर्तकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे अस्त्र

By आशपाक पठाण | Updated: September 12, 2023 17:06 IST

तुटपुंज्या मानधनामुळे कसरत, आक्रमक पवित्रा, शासकीय कर्मचारी दर्जा

लातूर : वाढती महागाई, महिन्यातून जवळपास २० दौरे, बैठका अन् मिळणारे तुटपुंजे मानधन याचा मासिक ताळमेळ लागत नाही. त्यामुळे मुलांचे शिक्षण, कौटुंबिक गरजा भागविताना कसरत करावी आहे. आज ना उद्या चांगले होईल, या अपेक्षेने काम करीत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील राज्यातील ३ हजार ५०० आशा गटप्रवर्तकांची तुटपुंज्या मानधनामुळे होरपळ होत आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण व शहरी भागात आरोग्यसेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या आशा गटप्रवर्तकांना तुटपुंज्या मानधनामुळे घरगाडा चालविणे कठीण झाले आहे. राज्यात २००५ पासून अभियानाला प्रारंभ झाला आहे. त्यात शासनाने आशा गटप्रवर्तकांची नेमणूक आरोग्य विषयक योजनांच्या अंमलबजावणीसाठी केली. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात महिन्यात जवळपास २० दौरे करावे लागतात. आशांना भेटी देणे, त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे, त्यांना मार्गदर्शन करणे, जॉबचार्टशिवाय वरिष्ठांची दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून घेण्यासाठी प्रयत्न करणे. मासिक बैठक घेऊन आशांच्या कामाचा मासिक अहवाल तयार करण्याचे काम गटप्रवर्तक करतात. यातून त्यांना मिळणारे मानधन हे अत्यंत तुटपुंजे आहे.

११ महिन्यांची ऑर्डर, दोन दिवसांचा ब्रेक...राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गटप्रवर्तकांना ११ महिन्यांची ऑर्डर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दिली जाते. दोन दिवसांचा ब्रेक देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार पुनर्नियुक्ती केली जाते. याच पद्धतीने इतर कर्मचारीही नेमले जातात. मात्र, गटप्रवर्तकांना शासन कंत्राटी कर्मचारी मानत नाही. त्यामुळे इतर लाभ मिळत नाहीत. दौऱ्यावर अधारित प्रवास भत्ता असून यातून मासिक जवळपास १३ हजार ५०० रुपये मिळतात. निम्मा खर्च प्रवासखर्चावर होतो. उर्वरित रक्कम घरखर्चालाही पुरत नसल्याने ओरड वाढली आहे.

कंत्राटीच्या वेतनात मोठी तफावत...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे सुसूत्रीकरण करून त्यांना नवीन वेतनश्रेणी ५ ऑक्टोबर २०२० पासून लागू केली आहे. लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपये मिळतात. गटप्रवर्तकांचे कामही जवळपास त्याच पद्धतीचे असतानाही शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. ३ फेब्रुवारी २०२२ च्या आदेशानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना ५ टक्के वार्षिक वाढ, १५ टक्के अनुभव बोनस शासन देते. मात्र, गटप्रवर्तकांना त्याचा लाभ मिळत नाही. यासह इतर लाभ मिळवून देण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर बुधवारी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रर्तक कर्मचारी कृती समितीचे भगवान देशमुख यांनी दिली.