शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण पुलाच्या कामामुळे लातूरच्या सात वस्त्यांचा पाणी पुरवठा बंद 

By हणमंत गायकवाड | Updated: September 12, 2022 17:42 IST

या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची पर्यायी सोय न करता पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

लातूर : शहरातील अंबाजोगाई रोडवर नॅशनल हायवेमार्फत उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागातील आर्वी जलकुंभाअंतर्गत असलेल्या सात वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाईपलाईन टाकून जोडणी पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने या वस्त्यांतील नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. 

लातूर मनपाच्या आर्वी जलकुंभाअंतर्गत आर्वी गायरान, हनुमान नगर, सोमवंशी नगर, डाळ मिल भाग, गडदे नगर, भगवानबाबा नगर, कौशल्यधाम आदी शहरालगतचा भाग आहे. या भागातील हजार ते बाराशे कुटुंबांचे नळकनेक्शन आर्वी जलकुंभाअंतर्गत पाईपलाईंवर आहे. मात्र लातूर-अंबाजोगाई रोडवर असलेल्या उड्डाण पुलाचे काम नॅशनल हायवेमार्फत चालू असल्याने मनपाला पुरवठा बंद कावा लागला आहे. पाईपलाईन टाकून जोडणी पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही. मनपाने या भागातील नागरिकांची सद्य:स्थितीत कसल्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था न करता पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

पर्यायी व्यवस्था न करताच काम सुरू... आर्वी गायरान, हनुमान नगर, सोमवंशी नगर, डाळ मिल भाग, गडदे नगर, भगवानबाबा नगर, कौशल्यधाम नगरात मनपाच्या नोंदीनुसार कमीत कमी हजार ते बाराशे नळकनेक्शन आहेत. या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची पर्यायी सोय न करता पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाणी मुबलक असताना या भागातील नागरिकांना आता टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. उड्डाण पुलाचे काम कधी पूर्ण होणार, पाईपलाईन टाकून जोडणी पूर्ण कधी होणार, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे सध्या तरी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडे नाहीत. त्यामुळे पाणी पुरवठा किती दिवस बंद राहील, किती दिवस नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागेल, याबाबतचे कसलेही नियोजन मनपाच्या पाणीपुरवठा विभागात नाही. पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक काढून मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

नागरिकांनी सहकार्य करावे जोपर्यंत काम सुरू आहे, पाईपलाईन टाकून जोडणी पूर्ण होत नाही तोपर्यंत काही तरी पर्यायी व्यवस्था पाणीपुरवठा विभागाकडून केली जाईल. तूर्त नागरिकांनी मनपाला सहकार्य करावे. नॅशनल हायवेमार्फत उड्डाण पुलाचे काम चालू आहे. त्यांना लवकरात लवकर काम करण्याचे कळविले आहे. - कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग मनपा

 

टॅग्स :laturलातूरWaterपाणी