शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले

By हणमंत गायकवाड | Updated: July 31, 2023 16:45 IST

इलेक्ट्रिकल बिघाड दुरुस्तीसाठी रिमझिम पावसाचा अडथळा

लातूर : मांजरा प्रकल्पामध्ये पाणीसाठा मुबलक असताना या ना त्या कारणाने शहराचा पाणीपुरवठ्यात वारंवार अडथळा येण्याच्या घटना घडत आहेत. वर्षभरात किमान आठ-दहा वेळा तरी वेगवेगळ्या कारणांमुळे पाणीपुरवठ्यात व्यत्य आला होता. सध्या हरंगुळ रेल्वे स्टेशन परिसरात केबल वायरची समस्या निर्माण झाल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. रिमझिम पावसामुळे दुरुस्तीलाही अडथळा आला असून पर्यायी व्यवस्था करून वीजपुरवठा केल्याने शुद्धीकरण सुरू झाले आहे. मात्र या अडथळ्यामुळे शहरातील प्रत्येक भागाचा पाणीपुरवठा दोन दिवसांनी पुढे गेला आहे.

हरंगुळ रेल्वे स्थानक परिसरामध्ये केबल वायर सतत जळत आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी वियची समस्या आहे. केबल वायर टाकले की ते जळत आहे. परिणामी,शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. दोन दिवस प्रयत्न करूनही दुरुस्ती झाली नाही. आता महावितरण कंपनीने पर्यायी व्यवस्था करून दिलेली आहे. मात्र ही व्यवस्था तात्पुरती आहे. मंगळवारी बिघाड झाला होता. दोन दिवस प्रयत्न केल्यानंतरही दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे बुधवारी पर्यायी व्यवस्था करून गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र वेळापत्रक कोलमडले आहे. प्रत्येक भागात दोन दिवसाने रोटेशन पुढे गेले आहे, अशी माहिती शहराचे पाणी वितरणाचे विभाग प्रमुख जलील शेख यांनी दिली.

प्रत्येक जलकुंभावरील रोटेशन बदलले....पाणीपुरवठा करण्यासाठी शहरात दहा जलकुंभ आहेत. या सर्व जलकुंभावरून पाणी सोडण्यासाठी वेळापत्रक आहे. कोणत्या भागात कोणत्या दिवशी पाणी सोडायचे याबाबतचे नियोजन असते. मात्र केबल वायरची समस्या झाल्याने इकडे वेळापत्रक कोलमडलेले आहे. शहरातील नागरिक पाणी का आले नाही याबाबत एकमेकांना विचारणा करत आहेत.

दररोज मांजरा प्रकल्पातून उचलले जाते ५० एमएलडी पाणी...शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मांजरा प्रकल्पातून दररोज पन्नास एमएलडी पाणी उचलले जाते. लातूर येथील हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्धीकरण झाल्यानंतर जलकुंभ निहाय वितरण केले जाते. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून ज्या भागात पाणी सोडण्याचा दिवस होता. त्या भागातील नागरिकांना पाणी सुटण्याची वाट पाहावी लागत आहे.

शहरातील नागरिकांची गैरसोय..नळाला पाणी सुटण्याचा दिवस असल्यानंतर गृहणी, नागरिक भांडे धुवून, कोरडे करून वाट पाहत असतात. मात्र गुरूवारपासूनच नळाला पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. शिवाय महानगरपालिकेकडून ही सूचना दिली नसल्यामुळे नळाला पाणी सुटण्याची वाट पाहू लागली.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका