शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले; निलंगा पालिकेकडे विजबिलाची पावणेचार कोटींची थकबाकी !

By संदीप शिंदे | Updated: April 1, 2024 13:24 IST

वारंवार वीजपुरवठा खंडित : उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे नियोजन कसे होणार

निलंगा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पाणी असूनही केवळ पालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे निलंगा शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. महावितरण कंपनीची ३ कोटी २६ लाख ८६ हजार रुपयांची थकबाकी तर ४५ लाखांची पाणीपट्टी अशी एकूण ३ कोटी ७१ लक्ष ८६ हजार रूपयांची थकबाकी आहे. त्यात महावितरण तर कधी सिंचन उपसा विभागामुळे पाणीपुरवठा बंद होतो आणि तांत्रिक बिघाड तर नेहमीच होत असतो. अशीच स्थिती राहिली तर उन्हाळ्यात पाणीपुरवठा होणार कसा असा सवाल उपस्थित होत आहे.

निलंगा शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा यासाठी माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी अथक प्रयत्नातून माकणी धरणावरून ४० किलोमीटर पाइपलाइन अंथरूण शहराला पाणीपुरवठा सुरळीत चालू केला. मात्र, २५ ते ३० वर्षांनंतर ही सर्व यंत्रणा जीर्ण झाल्यामुळे व लिकेजसचे प्रमाण वाढल्याने माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून ही संपूर्ण योजना करून घेतली होती. संबंधित गुत्तेदाराने ही योजना पूर्ण कार्यान्वित न करता गडबडीत पालिकेला हस्तांतरण केले. त्यामुळे यातील सर्व दोष तसेच राहिल्यामुळे वारंवार लिकेजसचा अडथळा येऊन पाणीपुरवठा ठप्प होऊ लागला आहे. परिणामी, नागरिकांना अशा कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

अशातच शहराला २४ तास पाणीपुरवठा करू असे सांगण्यात येऊन नळाला मीटर बसवण्यात आले. मात्र ते आजही नादुरुस्त अवस्थेत पडून असून, विनाकारण निधीचा चुराडा झाला आहे. सर्व शहरातील नागरिकांनी या नवीन पाईपलाईनचे डिपॉझिट भरून नळ कनेक्शन घ्यावे या हेतूने पालिका प्रशासनाने शहरातील पालिकेच्या मालकीचे ६५ बोअरवेल बंद करून टाकल्याने शहरातील नागरिकांना या मोठ्या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र पाण्याची आपत्कालीन परिस्थितीत पालिकेचे सर्व बोअर पुन्हा चालू केले पाहिजे अशी मागणी येथील अनेक संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या योजनेत दोष तर आहेतच त्यातच महावितरण कंपनीची थकबाकी कोट्यवधी रुपये असल्याने वारंवार पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा बंद केल्याने पाणी वितरण बंद होते.

पालिकेने नियोजन करण्याची मागणी...या थकबाकीत लघुदाब १७ लाख ४० हजार, उच्चदाब १ कोटी ६८ लाख ३७ हजार रुपये, नगरपरिषद दिवाबत्ती उच्चदाब १ कोटी ३९ लक्ष ९३ हजार, नगरपरिषद कार्यालय १ लाख १६ हजार अशी एकूण ३ कोटी २६ लक्ष ८६ हजार महावितरणची थकबाकी तर ४५ लाख रुपये पाणीपट्टी असे एकूण ३ कोटी ७१ लाख ८६ हजार रुपये थकबाकी आहे. याच थकबाकीमुळे कायम पाण्याचा त्रास होणार असेल तर पालिकेने याबाबत काय नियोजन केले आहे, त्यासंबंधी ठोस पावले उचलून कायमस्वरूपी बंदोबस्त करावे अशी मागणी निलंगावासीयांनी केली आहे.

शहरातील ६५ बोअरवेल सुरु करावेत...निलंगा शहरातील पालिकेच्या मालकीचे ६५ बोअरवेल बंद करून टाकल्याने शहरातील नागरिकांना या मोठ्या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र पाण्याची आपत्कालीन परिस्थितीत पालिकेचे सर्व बोअर पुन्हा चालू केले पाहिजे अशी मागणी येथील अनेक संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. मात्र, याबाबत प्रशासनाने कोणतीच उपाययोजना अद्याप राबविलेली नाही. उन्हाची तीव्रता पाहून उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिका