शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खंडित वीजपुरवठ्याने लातूरात पाणी पुरवठा ठप्प; ४ दिवसांआड पाण्याचे वेळापत्रक कोलमडले!

By हणमंत गायकवाड | Updated: May 4, 2023 17:59 IST

धनेगाव येथील मांजरा प्रकल्पावर पाणी उचलण्यासाठी जे पंप आहेत, त्या पंपांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही.

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पावरील वीज पुरवठ्यामध्ये वारंवार बिघाड होत असल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. चार दिवसांआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकच कोलमडले आहे. यामुळे लातूर शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. 

गेल्या १६ एप्रिलपासून वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय होत आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. धनेगाव येथील मांजरा प्रकल्पावर पाणी उचलण्यासाठी जे पंप आहेत, त्या पंपांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही. मुरुड सबस्टेशन ते धनेगाव सबस्टेशनपर्यंत सारखा बिघाड होत आहे. वाऱ्यामुळे तारा तुटत आहेत. तसेच इन्क्युबिलेटर यामुळे खराब झालेले आहे. परिणामी, पाणी उपसा करता येत नाही. यामुळे लातूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून नियमित चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु, वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. आता आठ दिवसांच्या वर कालावधी लागत आहे.

दररोज ६० एमएलडी पाण्याची उचलमांजरा धरणातून लातूर शहरासाठी दररोज ५० ते ६० एमएलडी पाणी उचलले जाते. या पाण्याचे हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्धीकरण होऊन लातूर शहरातील नऊ जलकुंभांवरून वितरण होते. परंतु, वादळी वाऱ्यामुळे मुरुड सबस्टेशन ते धनेगाव सबस्टेशनपर्यंत सातत्याने बिघाड होत आहे. या तांत्रिक बिघाडामुळे धनेगाव येथून पाणी उचलण्यास अडथळा होत आहे. मागच्या शनिवारी हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. मात्र, त्यानंतरही बिघाड झाल्याने पाणी वितरण कोलमडले आहे.

महावितरणकडून दुरुस्ती सुरूमहावितरणकडून मुरुड सबस्टेशन ते धनेगाव सबस्टेशनपर्यंत दुरुस्ती, शिवाय जे साहित्य जळाले आहे ते साहित्य बदलले जात आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. बुधवारी रात्री दुरुस्ती केल्यानंतर पाणी उचलण्यात आले होते. त्यातून शहरातील काही भागात पाणी सोडण्यात आले, असे लातूर मनपातील पाणी वितरण प्रमुख जलील शेख यांनी सांगितले.

नागरिकांनी सहकार्य करावंवादळी वाऱ्यामुळे वीज तारा तुटत आहेत. शिवाय, वाऱ्यामुळे तारा घर्षण होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. या समस्यांमुळे मांजरा धरणावरून पाणी उचलण्यासाठी अडथळा येत आहे. जशी लाईट येईल तसे पाणी उचलले जात आहे. त्यानुसार लातूर शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांनी होत असलेल्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे. - जलील शेख, पाणी वितरण प्रमुख, लातूर मनपा.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी