शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

लातूर महानगरपालिकेच्या शाळांना गळती; मुलांच्या शिक्षणाची हेळसांड..!

By हणमंत गायकवाड | Updated: July 21, 2023 17:45 IST

संगणक कक्ष, प्रयोगशाळेचे साहित्य पाण्यात भिजले;भिंतीतूनही पाणी पाझरते

लातूरमनपाच्या न्यू काझी मोहल्ला येथील शाळा क्रमांक १३ व मंठाळे नगर येथील शाळा क्रमांक ९ मधील काही वर्गखोल्यांना गळती लागली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांच्या पावसामुळे छतावरून पाणी झिरपत आहे. वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, काही वर्गखोल्यांची अवस्थाही बिकट झाली आहे. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. 

शाळा क्रमांक ९ आणि १४ ला गळतीन्यू काझी मोहल्ला येथे शाळा क्रमांक १३ असून, उर्दू माध्यमातील ही शाळा आहे. या शाळेतही गळतीमुळे गैरसोय होत आहे. याचा थेट परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत आहे. गोरगरीब, कष्टकरी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी छत गळती हे विघ्न आहे. शाळा क्रमांक १३ ला मोठी गळती आहे. त्यामुळे पावसात मुलं भिजतात. छताला अनेक ठिकाणी खपल्या, भेगा पडलेल्या आहेत.महानगरपालिकेच्या एकूण १६ शाळा आहेत. काही शाळांमध्ये सेमी इंग्रजी असल्यामुळे पट वाढतो आहे. परंतु, सुविधांचा अभाव आहे. 

काही छतांना तडे अन् भेगाही...महानगरपालिकेच्या शहरात एकूण १६ शाळा आहेत. त्यापैकी मंठाळे नगर येथील शाळा क्रमांक ९ ही गुणवत्तेत चांगली आहे. या शाळेचा लौकिक आहे. परंतु, सध्या गळतीमुळे विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, निवेदनावर राजा मणियार, डी. उमाकांत, जाकीर तांबोळी, बसवेश्वर रेकुळगे, फिरोज पठाण, इरफान शेख, उस्मान शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :laturलातूरEducationशिक्षणMuncipal Corporationनगर पालिका