शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती; रविराजाच्या रौद्ररुपामुळे टंचाईची दाहकता वाढली

By हरी मोकाशे | Updated: May 17, 2023 18:55 IST

वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाई वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील ८५ गावांत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे

लातूर : रविराजा दिवसेंदिवस रौद्ररुप धारण करीत आहे. त्यामुळे दुपारच्यावेळी अंगाची लाही- लाही होत आहे. वाढत्या उन्हामुळे जलसाठे आटू लागले आहेत. परिणामी, पाणीटंचाईच्या झळा वाढत आहेत. सध्या जिल्ह्यातील ८५ गावे व वाड्यांना पाणीटंचाईचे चटके जाणवत आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून अधिग्रहणाद्वारे ६२ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्पांसह नदी, नाले तुडुंब भरले होते. परिणामी, यंदाच्या उन्हाळ्यात कमी प्रमाणात पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. जलसाठे भरल्यामुळे रबी हंगामाचा पेराही वाढून हरभऱ्याचे उत्पादन वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळाला.

दरम्यान, यंदाच्या मार्चअखेरपासूनच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिलपासून तर उष्णतेमुळे जीवाची काहिली होण्यास सुरुवात झाली. वाढत्या उन्हामुळे कमाल तापमान वाढून पारा ४२ अं.से. च्या वर पोहोचला. परिणामी, जलसाठ्यातील पाण्याच्या बाष्पीभवनात वाढ झाली आहे. त्यामुळे जलसाठ्यांतील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे.

८५ गावांवर पाणीटंचाई ढग...

वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाई वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील ८५ गावांत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यात ६२ गावे आणि २३ वाड्यांचा समावेश आहे. सर्वाधिक टंचाई अहमदपूर तालुक्यात जाणवत असून ३२ अशी संख्या आहे. लातूर तालुक्यात ५, औसा- २२, निलंगा- ८, रेणापूर- ३, चाकूर- ३, उदगीर- ३, जळकोट तालुक्यातील ९ गावांत टंचाई आहे.

६३ गावांना अधिग्रहणाचे पाणी...जिल्ह्यातील ८५ गावांनी अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्याची तपासणी होऊन ते तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. मंजुरीनंतर ६२ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यात लातूर तालुका- २, औसा- १८, निलंगा- ३, रेणापूर- १, अहमदपूर- २८, चाकूर- २, उदगीर- ३, जळकोट तालुक्यातील ५ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.

अवकाळीमुळे बंधाऱ्यात जलसाठा...

गेल्या महिनाभराच्या कालावधीत सातत्याने अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे औराद शहाजानी परिसरातील तेरणा आणि मांजरा नद्यांना काही प्रमाणात जलसंचय झाला. तसेच कोल्हापुरी आणि उच्चस्तरीय बंधाऱ्यांत ही जलसाठा झाला. अवकाळीमुळे पीक, फळबागांचे नुकसान झाले. मात्र, काही प्रमाणात पाणीसाठा होऊन टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे.

अद्याप टँकर नाही...जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यातील एकाही गावास पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे अधिग्रहणासाठी एकही प्रस्ताव दाखल नाही. तसेच जिल्ह्यात कुठलेही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु नाही. अधिग्रहणाद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी