शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पावसात झाडाखाली थांबणे जिवावर बेतले; वीज पडून शेतमजुराचा मृत्यू, दोघे जखमी

By संदीप शिंदे | Updated: August 14, 2024 18:30 IST

देवणी तालुक्यातील हिसामनगर (माटेगडी) येथील घटना 

वलांडी (जि. लातूर) : पाऊस सुरू असताना झाडाखाली थांबणे मजुराच्या जिवावर बेतले आहे. देवणी तालुक्यातील हिसामनगर (माटेगडी) येथे बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वीज पडून एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर दोघे जण जखमी झाले आहेत.

हिसामनगर येथील शेतमजूर संदीप केशव वाघमारे (वय ३५) हे शेती कामासाठी कल्याण मिरकले यांच्या शेतात गेले होते. बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास झालेल्या पावसात तिघेजण शेतातील झाडाखाली थांबले होते. यादरम्यान, वीज पडल्याने संदीप वाघमारे हा जागीच मयत झाला. तर अन्य दोघांना विजेची झळ बसल्याची माहिती सरपंच विजयकुमार मुके, पोलिस पाटील विलास पाटील यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच मंडळाधिकारी बालाजी केंद्रे व तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला. मयत संदीप वाघमारे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, असा परिवार असून त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

एका जखमींवर उपचार सुरु...पाऊस सुरु असल्याने तिघेजण झाडाखाली थांबले होते. त्याचवेळी वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत. यातील जखमी दत्तू माधव येदले यांना वलांडी येथे प्रथमोपचार करुन उदगीर येथील दवाखान्यात पाठविण्यात आले. दरम्यान मयताच्या वारसास नुकसान भरपाई देण्याची मागणी सरपंच सपना विजयकुमार मुके यांनी प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र