शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
5
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

जय हरी विठ्ठल, समर्थ धोंडूतात्या महाराज की जय; आषाढी यात्रेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी रिघ

By हरी मोकाशे | Updated: July 17, 2024 18:32 IST

श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या दर्शनासाठी अनेक भाविक अनवाणी पायी चालत येत होते.

डोंगरशेळकी (लातूर) : टाळ- मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी, समर्थ धोंडूतात्या महाराज की जय अशा जयघोषात आषाढी यात्रेनिमित्ताने जवळपास दोन लाख भाविकांनी मराठवाड्याचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरशेळकी येथील श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या समाधीचे बुधवारी दर्शन घेतले.

उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी येथील श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या समाधी स्थळास तीर्थक्षेत्राचा ब दर्जा आहे. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी भाविकांची दर्शनासाठी रीघ असते. बुधवारी पहाटे ५ वाजता उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व सुविद्य पत्नी स्वाती शिंदे यांच्या हस्ते श्री धोंडूतात्या महाराजांच्या समाधी महापूजा व आरती करण्यात आली. त्याचबरोबर वारकरी बाबुराव मधुकरराव पाटील यांना महापुजेचा मान मिळाला. यावेळी मंदिराचे विश्वस्त व्यंकटराव मुंढे, बाबुराव घटकार, पुजारी अनिल कुलकर्णी, पोलिस पाटील भालचंद्र शेळके, चेअरमन हणमंतराव मुंढे, माजी सरपंच मारोतीराव मुंढे, ज्ञानोबा मुंढे, व्यंकटराव मरलापल्ले, बालाजी मुंढे, जनार्दन मुंढे, गणेश मुंढे, तलाठी दत्तात्रय मोरे आदी उपस्थित होते. दुपारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी पूजा व आरती करुन दर्शन घेतले. तत्पूर्वी माजी आ. सुधाकर भालेराव यांनी दर्शन घेतले.

यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती मंत्री बनसोडे यांनी दिली. याप्रसंगी सिध्देश्वर पाटील, तहसीलदार राम बोरगावकर, पं.स. माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, प्रा. शाम डावळे, वसंत पाटील, बालाजी भोसले, दत्ता बामणे आदी उपस्थित होते.

अनवाणी पायी येऊन घेतले दर्शन...श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या दर्शनासाठी अनेक भाविक अनवाणी पायी चालत येत होते. श्री समर्थ धोंडूतात्या महाराज की जय जय, विठ्ठल विठ्ठल जय हरी असा जयघोष करीत दिंड्या येत होत्या. त्यामुळे मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांसाठी मंदिर संस्थान व अभिजित गायकवाड यांच्या वतीने मोफत फराळ व पाण्याची सोय करण्यात आली होती. येथील धोंडूतात्या विद्यालयाच्या वतीने दिंडी काढण्यात आली होती.

प्रवाशांच्या सेवेसाठी बसेस...यात्रेनिमित्ताने भाविकांच्या सेवेसाठी उदगीर आगाराच्या वतीने बसेस सोडण्यात आल्या होत्या. दिवसभरात १२० फेऱ्या झाल्या. यावेळी आगारप्रमुख चिनमय चिटणीस, वाहतूक नियंत्रक सचिन पटवारी, प्रदीप काळे उपस्थित होते. वाढवणा ठाण्याचे सपोनि. भीमराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आरोग्य विभागाकडून सेवा...भाविकांना आरोग्य सेवा देण्यासाठी गुडसूर प्राथमिक आरोग्य केंद्र व डोंगरशेळकीतील उपकेंद्राचे पथक होते. डॉ. अनुजा दाताळ, डॉ. अमित देवकते, एम.एन. वजिरे, सुलोचना मुंडे, सुभाष राठोड आदींनी भाविक रुग्णांना सेवा दिली. तसेच रक्तदान शिबीर घेण्यात आले.

टॅग्स :laturलातूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी