शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Video - लातूरमध्ये दर गडगडल्याने तीन एकर कोथिंबिरीवर फिरविला नांगर

By हरी मोकाशे | Updated: August 20, 2023 16:57 IST

निलंगा तालुक्यातील राठोडा येथील शेतकरी बदलू शेख यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोथिंबिरीस चांगला भाव असल्याचे पाहून तीन एकरवर लागवड केली.

लातूर : चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल, या आशेने निलंगा तालुक्यातील राठोडा येथील एका शेतकऱ्याने तीन एकरवर कोथिंबिरीची लागवड केली होती. मात्र, सध्या बाजारात दर कोसळल्याने निराश झालेल्या या शेतकऱ्याने संपूर्ण कोथिंबिरीच्या पिकावर शनिवारी ट्रॅक्टर फिरविला आहे.

निलंगा तालुक्यातील राठोडा येथील शेतकरी बदलू शेख यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोथिंबिरीस चांगला भाव असल्याचे पाहून तीन एकरवर लागवड केली. त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल आणि संसारास चांगला हातभार लागेल, अशी अपेक्षा होती. त्यासाठी त्यांचा ५५ हजार रुपयांचा खर्च झाला होता. दरम्यान, कोथिंबिर चांगली बहरली होती. त्यामुळे आनंद वाढला होता. कोथिंबीर काढणीस आली तेव्हा अचानकपणे बाजारात दर कोसळले. त्यामुळे लागवडीचा खर्चही पदरी पडण्याची आशा मावळली. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेख यांनी शनिवारी तीन एकरावरील कोथिंबिर पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे. परिणामी, शेख यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

जुलैमध्ये कॅरेटला ८०० रुपये भाव..

जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोथिंबिरीच्या कॅरेटला ७०० ते ८०० रुपये भाव होता. त्यामुळे तीन एकरवर लागवड केली होती. त्यातून किमान तीन ते चार लाखापर्यंत उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दर घसरल्याने आशेवर पाणी फिरले आहे. कोथिंबिरीमुळे खरीप हंगामही घेता आला नाही.- बदलू शेख, शेतकरी.

आतापर्यंत ८१ हजारांचा खर्च...जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोथिंबिरीची लागवड केली होती. लागवडीपासून ते काढणीपर्यंत ८१ हजार रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. मात्र, सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात दर कोसळले आहेत. त्यामुळे व्यापारी खरेदीसाठी धजावत नसल्याने नांगर फिरविला आहे. कोथिंबिरीमुळे आर्थिक संकट ओढवले आहे, असे शेतकऱ्याने सांगितले.

प्रशासनाने मदत द्यावी...गावातील शेख या शेतकऱ्याने कोथिंबिरीची लागवड केली होती. मात्र, दर कोसळल्याने संकट आले आहे. कोथिंबिरीमुळे खरीपातील सोयाबीनचे उत्पादनही घेता आले नाही. या शेतकऱ्यास जवळपास ८० हजारांचा फटका बसला आहे. प्रशासनाने नुकसानीची पाहणी करुन आर्थिक मदत द्यावी.- ताजोद्दीन शेख, ग्रामपंचायत सदस्य.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी