गेल्या चार दिवसांपासून सतत वातावरणात बदल होत आहे. दुपारपर्यंत कडक उन्हं जाणवत आहे तर त्यानंतर जोरदार वारे वाहून अवकाळी पाऊस होत आहे. रविवारी दुपारी २ ते ३ वा. च्या सुमारास मुळकी व उमरगा कोर्ट येथे वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, मुळकी येथील शेतकरी नानासाहेब सूर्यवंशी यांच्या गट क्र. १५४ मधील आखाड्यावर वीज कोसळली. त्यात दोन बैल जागीच ठार झाले. या बैल जोडीची किंमत १ लाख ४५ हजार आहे. दरम्यान, उमरगा कोर्ट येथील गट क्र. ४४० मध्ये वीज पडली. राजेंद्र लोहारे यांच्या शेतात वीज पडल्याने एक म्हैस दगावली. तिची किंमत ९० हजार असल्याचे शेतक-याने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच तलाठी निळकंठ कुलकर्णी यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला.
अवकाळी पाऊस, वीज पडून तीन जनावरे दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:15 IST