शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उदगीरमध्ये अतिक्रमण हटविण्यासाठी व्यापा-यांनी पुकारला बेमुदत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 17:46 IST

शहराची बाजारपेठ असलेल्या पत्तेवार चौकात हातगाडे थांबत आहेत़ त्याचबरोबर काहींनी अतिक्रमण केले आहे़ परिणामी, नागरिकांना ये-जा करणे कठीण होते. यामुळे ही अतिक्रमणे हटविण्यात यावीत, अशी व्यापा-यांकडून मागणी आहे.

ठळक मुद्देआज सकाळी हातगाडाचालक व एका व्यापा-यात बाचाबाची झाली़. यामुळे संपूर्ण बाजारपेठेतील व्यापा-यांनी अतिक्रमणे व हातगाडे काढण्यासाठी बेमुदत बंद पुकारला आहे. दिवसभरात १० लाखांची उलाढाल ठप्प

उदगीर : शहराची बाजारपेठ असलेल्या पत्तेवार चौकात हातगाडे थांबत आहेत़ त्याचबरोबर काहींनी अतिक्रमण केले आहे़ परिणामी, नागरिकांना ये-जा करणे कठीण होते. यामुळे ही अतिक्रमणे हटविण्यात यावीत, अशी येथील व्यापा-यांकडून मागणी आहे. यातच आज सकाळी हातगाडाचालक व एका व्यापा-यात बाचाबाची झाली़. यामुळे संपूर्ण बाजारपेठेतील व्यापा-यांनी अतिक्रमणे व हातगाडे काढण्यासाठी बेमुदत बंद पुकारला आहे. त्यामुळे दिवसभरात जवळपास १० लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे.

शहरातील पत्तेवार चौक व परिसरात हातगाडे थांबतात़ त्याचबरोबर अतिक्रमणांनी विळखा घातला आहे़ त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी ये-जा करणा-या अबालवृध्दांना त्याचा त्रास होत आहे़ अतिक्रमणांचा सर्वाधिक त्रास महिला, मुलींना होत आहे़ सन २०११ मध्ये पत्तेवार चौकातील व्यापा-यांनी या ठिकाणी पोलीस मदत केंद्राची चौकी उभारावी अशी मागणी केली होती़ परंतु, ती अद्यापही पूर्ण झाली नाही. या चौक परिसरात किराणा, भुसार, मेडिकल, भांडी, गृहउपयोगी वस्तू ते भाजीपाल्याची बाजारपेठ आहे़ त्यामुळे खरेदीसाठी अबालवृद्धांची नेहमी गर्दी असते़ या परिसरात सुरक्षितता आणि वाहतुकीची शिस्तीसंदर्भात ‘लोकमत’मधून यापूर्वी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते़ त्यामुळे आमदार सुधाकर भालेराव, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, मुख्याधिकारी नितीन कापडणीस, उदगीर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भीमाशंकर हिरमुखे आदींनी पुढाकार घेऊन या भागातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात करण्यात आली होती़ परंतु, नगर परिषद व पोलीस प्रशासन यांच्यात एकी न झाल्याने ही मोहीम थंडावली.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी एक व्यापारी व एका हातगाडेचालकात वाद होऊन बाचाबाची झाली़ त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाºयांनी अतिक्रमणे व हातगाडे हटवावेत, अशी मागणी करीत बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्यास सुरुवात केली़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमाशंकर हिरमुखे व नगर परिषदेचे अधिकारी गोलंदाज यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन व्यापाºयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला़ मात्र, व्यापाºयांनी आपण माघार घेत नसल्याचे स्पष्ट करीत निवेदन दिले़ या भागातील हातगाडे, अतिक्रमणे हटवावीत, सेंट्रल पार्किंग बंद करावी, रस्ते खुले करावेत, अशा मागण्या व्यापा-यांनी केल्या आहेत़

अतिक्रमणांमुळे व्यापा-यांत असुरक्षिततेची भावना़या भागात पोलीस मदत केंद्र निर्माण करावे, अशी आम्ही सन २०११ पासून मागणी करीत आहोत़ तसेच हातगाडे थांबत असल्याने आणि अतिक्रमणे वाढल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे़ व्यापारीही त्रस्त झाले आहेत़ पोलीस मदत केंद्रासंदर्भात पोलीस महासंचालकांपर्यंत मागणी करण्यात आली होती़ याच मागणीसाठी १८ ते २० आॅगस्ट २०११ या कालावधीत बाजारपेठ बंदही ठेवण्यात आली होती, असे व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी रामदास जळकोटे यांनी सांगितले़ 

अतिक्रमण हटाव मोहीम राबवू़शहरातील नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी नगर परिषद कटिबध्द आहे़ शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी मोहीमही सुरु करण्यात आली होती़ परंतु, वेळेवर पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने ही मोहीम थंडावली़ आता पुन्हा मोहीम सुरु करण्यात येईल, असे नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांनी सांगितले़ दरम्यान, उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणाले, अतिक्रमण हटविण्यासाठी नगर परिषदेला सर्व सहकार्य केले जाईल.