शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
5
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
6
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
7
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
8
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
9
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
10
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
11
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
12
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
13
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
14
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
15
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
16
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
18
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
19
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
20
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन

उदगीर-अहमदपूर रस्ता बनला जीवघेणा; अनेक ब्लॅकस्पॉटमुळे एकाच महिन्यात नऊ बळी !

By संदीप शिंदे | Updated: February 3, 2024 18:21 IST

मालवाहतूक व प्रवासी वाहतूक, दुचाकी चालकांना रस्त्यावरून वाहन चालवताना फार मोठी कसरत करावी लागते.

उदगीर : येथील उदगीर-अहमदपूर रस्त्यावर मागील एका महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात ९ जणांचे बळी गेले आहेत. सातत्याने अपघात होत असलेल्या या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठल्याही सूचनाफलक लावण्यात आलेले नाही. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या रस्त्यावर अनेक ब्लॅक स्पॉट निर्माण झाले आहेत. त्याठिकाणी सूचना फलक लावण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

उदगीर शहराचा भौतिक विकास झपाट्याने होत आहे. केंद्र व राज्य सरकारकडून तालुक्यामध्ये रस्ते बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहेत. काही भागातील रस्ते पूर्ण झालेले आहेत तर काही रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. उदगीर-अहमदपूर हा शहराच्या दृष्टीने वाहतुकीसाठी महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहनाची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. लोणी मोड, हाकनकवाडी, तोंडार पाटी, गंडी पाटी, मन्ना उमरगा, इस्मालपूर, एकुर्गा दरम्यान रस्ता हा अतिशय नागमोडी पद्धतीने असल्याने अनेक वाहनचालक त्यांचे वाहन चालवताना गडबडून जातात. त्यामुळे दररोज एखादा तरी अपघात या रस्त्यावर होतो.

मालवाहतूक व प्रवासी वाहतूक, दुचाकी चालकांना रस्त्यावरून वाहन चालवताना फार मोठी कसरत करावी लागते. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने उपयुक्त असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर कुठलेही सूचनाफलक लावलेले नाहीत. त्यामुळे उदगीर ते इस्मालपूर दरम्यान मागील एका महिन्यात ९ जणांचा बळी गेल्याची नोंद शासन दप्तरी आहे. हे जीवघेणे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठिकठिकाणी गतिरोधक उभे करण्याची गरज आहे. मात्र, फलक नसल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. एका महिन्यात नऊ जणांना या रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला असून, यातील बहुतांश जण हे दुचाकीवर होते. फलक असते तर अपघात रोखण्यास काही प्रमाणात मदत झाली असती. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

ठेकेदारास फलक लावण्याच्या सूचना...पोलिस प्रशासन किंवा जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरूनच मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसवता येऊ शकतो. मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहीत. उदगीर-अहमदपूर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराला दिशादर्शक बसवण्याचे सूचना देण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण देवकर यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी...ग्रामीण भागातून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची गरज असतानासुद्धा याठिकाणी फलक लावलेले नाहीत. पुढे गाव आहे, पुढे वळण रस्ता आहे, अपघात प्रवण रस्ता, वाहने सावकाश चालवा, पुढे अरुंद पूल आहे, वेग मर्यादा सांभाळा असा कुठलाही सूचनाफलक या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आलेला नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर