टॅबची झाली चाेरी, अज्ञातावर गुन्हा
लातूर : बॅगखाली टॅब ठेवून बाथरूमला गेलेल्या एकाचा टॅब अज्ञातांनी चाेरून नेल्याची घटना शिरुर अनंतपाळ ठाण्याच्या हद्दीत १४ ऑगस्ट राेजी घडली. याबाबत शिरुर अनंतपाळ पाेलीस ठाण्यात अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी अविनाश शेषेराव डुकरे वय ३६ रा. शिरुर अनंतपाळ हे शासकीय रुग्णालयात क्षयराेग सुपरवायझर म्हणून सेवारत आहेत. ते आपल्या जवळील बॅगखाली टॅब ठेवून बाथरूमला गेले असता, त्यांचा टॅब काेणीतरी अज्ञाताने चाेरून नेला. याबाबत शिरुर अनंतपाळ पाेलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर शहरातून माेटारसायकल चाेरी
लातूर : घरासमाेर थांबविण्यात आलेली माेटारसायकल अज्ञातांनी पळविल्याची घटना उदगीर येथील डॅम राेड परिसरात १० ऑगस्ट राेजीच्या रात्री घडली. याबाबत उदगीर शहर पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी भीमराव गुरुनाथअप्पा मुळीक वय ६१ रा. डॅमराेड, उदगीर यांनी आपल्या ताब्यातील माेटारसायकल एम.एच. २४ ए.आय. ०८३८ घरासमाेर थांबवून झाेपले असता, पहाटे उठून पाहिले असता दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी माेटारसायकलचा शाेध घेतला असता, ती मिळून आली नाही. याबाबत उदगीर शहर पाेलीस ठाण्यात अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलीस नाइक सगर करीत आहेत.