शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या गोकुळ मंत्री खून प्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा, तीन साक्षीदार झाले फितूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 12:36 IST

२४ जणांची साक्ष, लातूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

- राजकुमार जोंधळे

लातूर : सुपारी खाण्याचा बहाणा करत घराबाहेर बोलावून घेत चाकू, कोयत्याने सपासप वार करत गोकुळ मंत्री या तरुणाचा खून करणाऱ्या दोघांना लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.बी. रोटे यांनी सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात एकूण २४ जणांची न्यायालयात साक्ष झाली. 

लातुरातील दादोजी कोंडदेव नगर येथे राहणारा तरुण गोकुळ बंडुलाल मंत्री (वय २७) हा आपल्या पत्नीसह वास्तव्याला होता. दरम्यान, १० ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ३ वाजता गोकुळ मंत्री हे घरी होते. त्यावेळी आरोपी प्रसाद विठ्ठलराव शिंदे ( वय १९ ) आणि कौस्तुभ संजय कांबळे (वय २०, दोघे रा. यशवंत नगर, जुना औसा रोड, लातूर) हे दोघे त्यांच्या घराकडे आले. यावेळी सुपारी खाण्याच्या बहाण्याने गोकुळ मंत्री यांना घराबाहेर बोलावून घेतले. एकाच दुचाकीवरून सुपारी खाण्यासाठी ते निघाले. दरम्यान, सुपारी खाल्यानंतर गोकुळ मंत्री यांच्यावर हल्ला करण्यात आला. या खटल्यात सबळ पुरावे आणि साक्षीदारांनी नोंदवलेल्या साक्षीवरून न्यायाधीश आर.बी. रोटे यांनी दोन्ही आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

याप्रकरणी लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाटला चालला. सरकार पक्षाकडून जिल्हा प्रमुख सरकारी अभियोक्ता संतोष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी वकिल एस. आर. मुंदडा यांनी बाजू मांडली. त्यांना शिवाजी नगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप सागर, वकील ए. के. काझी, वकील ए. ए. वाघमारे, पोलिस कर्मचारी कडगे, तपास अधिकारी एस. बी. पुजारी यांनी सहकार्य केले.

दिशाभूल करून काढला गोकुळ मंत्री यांचा काटा...सुपारी खाल्यानंतर आम्हाला दुचाकीवरून घराकडे सोड म्हणत गोकुळ मंत्री यांना दुचाकी चालविण्यास सांगितले. दरम्यान काही अंतरावर गेल्यानंतर दोघा आरोपींनी चाकू, कोयत्याने सपासप ४१ वार केले. त्यानंतर आरोपी घराकडे पायी गेले. 

हल्ल्यात गोकुळ मंत्री रक्ताच्या थारोळ्यात पडले...काही वेळात गोकुळ मंत्री यांच्या पत्नीला एका व्यक्तीने घटनेची माहिती दिली. पत्नीने घटनास्थळी धाव घेतली तर पती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. शरीरावर अनेक वार करण्यात आल्याचे दिसून आले. चेहऱ्यावर, मानेवर, पाठीवर गंभीर वार करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

प्रत्यक्षदर्शी तीन साक्षीदारांनी न्यायालयामध्ये साक्ष फिरवली...गोकुळ मंत्री यांच्यासह आरोपी दुचाकीवरून जाताना आणि आरोपी हल्ला करताना खिडकीतून पाहणारा अल्पवयीन मुलगा असे तीन जण साक्षीदार होते. मात्र, ऐनवेळी या साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवत फितुरपणा केला. मात्र, सरकार पक्षाकडून दाखल करण्यात असलेल्या पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय