पोलिसांनी सांगितले, किल्लारी पाटीजवळ एक किलोमीटर आंतरावर उमरगा जाणाऱ्या महामार्गावर विश्वजीत पाटील यांच्या शेताजवळ दोन मोटरसायकलची एकमेकासमोर धडक झाली.
किल्लारी येथून समाधान राम कांबळे (२६, रा. कवठा, ता. उमरगा) हा एमएच २५ एक्यू ३२१७ क्रमांकाच्या दुचाकीवर कवठा गावाकडे जात असताना समोरून निलेश मदन पाटील (२३ रा. वाणेवाडी ता.औसा ) हा एमएच २४ बीएच ५२४ वर किल्लारीकडे येत होता. दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी किल्लारीच्या ग्रामीण रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. घोडके यांनी तपासणी करून मयत घोषित केले. याप्रकरणी डॉ. एम.के.आनीगुंठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किल्लारी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास बिट जमादार गौतम भोळे व आबा इंगळे करीत आहेत.