शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नियमित आणि वेळेत उपचार केल्यास क्षयरोग आटोक्यात : एस.एस. फुलारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 19:44 IST

क्षयरोग झाल्याचे निदान झाल्यानंतर घरपोच औषधी पुरविण्यात येतात.

ठळक मुद्देवर्षभरात पावणेतीन हजार रुग्णांवर यशस्वी उपचार

लातूर : नियमित आणि वेळेत उपचार केल्यास क्षयरोग बरा होऊ शकतो. त्याअनुषंगाने जिल्हा क्षयरोग विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली असून, रुग्णाला क्षयरोग झाल्याचे निदान झाल्यानंतर घरपोच औषधी पुरविण्यात येतात. नोव्हेंबर २०१७ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत या उपक्रमांतर्गत २ हजार २७५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. हे रुग्ण ठणठणीत झाले असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एस. फुलारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

डॉ. फुलारी म्हणाले, क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर सहा महिने नियमित औषध घेतल्यानंतर क्षयरोग बरा होता. क्षयरोगमुक्त जिल्हा करण्यासाठी विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. तपासण्या करून रोगाचे निदान केले गेले. त्यानंतर उपचार केल्यानंतर २ हजार २७५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यात अहमदपूर १९४, औसा १३९, चाकूर ९२, देवणी ५८, जळकोट ७३, लातूर शहर ७७८, लातूर ग्रामीण ४३३, निलंगा २०४, रेणापूर ७४, शिरूर अनंतपाळ ३४, उदगीर १९६ आदी २ हजार २७५ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. सद्य:स्थितीत अहमदपूर तालुक्यात ८०, औसा ५८, चाकूर ४२, देवणी २८, जळकोट ४२, लातूर शहर ३५२, लातूर ग्रामीण २१२, निलंगा ८८, रेणापूर ३२, शिरूर अनंतपाळ १२, उदगीर ८२ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णांचीही प्रकृती आता सुधारली असून, लवकरच ते क्षयमुक्त होतील, असेही जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. फुलारी यांनी सांगितले. 

क्षयरुग्णांवर मोफत उपचार... क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असल्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे क्षयरोग विभागाच्या वतीने समुपदेशन करून जनजागृती केली जाते. ज्या रुग्णांना क्षयरोग झाला, अशा रुग्णांवर मोफत उपचार केले जातात, असेही डॉ. फुलारी यांनी सांगितले. 

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलLatur civil hospitalजिल्हा रुग्णालय लातूर