निलंगा येथील जिजाऊ चौकात काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे अभय साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, सचिन दाताळ, ॲड. बाबासाहेब गायकवाड, प्रवीण सूर्यवंशी, बालाजी वळसांगवीकर, ॲड. नारायण सोमवंशी, सरपंच श्रीकांत साळुंके, दत्ता देशमुख, सिद्धेश्वर बिरादार, उपसरपंच मदन बिरादार, वामनराव चव्हाण, माधवराव पाटील, उपसरपंच महेश भंडारे, बालाजी भंडारे, अजगर अन्सारी, ॲड. संदीप मोरे, गोविंद सूर्यवंशी, ॲड. तिरुपती शिंदे, उपसरपंच जाधव, चेअरमन काकासाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, धनाजी चांदुरे यांची उपस्थिती हाेती. उटगे म्हणाले, काँग्रेस पक्षाचे हे जनसंपर्क कार्यालय म्हणजे, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मार्गी लावण्याचे दालन आहे. सामान्य माणसांना न्याय मिळवून द्यावे. शिवाय, आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या जुन्या आणि नवीन पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन एकजुटीने काम करावे, असेही ते म्हणाले. दरम्यान, पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५२ दात्यांनी रक्तदान केले. ॲड. तिरुपती शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. संदीप मोरे यांनी आभार मानले. हे कार्यालय सामान्यांच्या हक्काचे दालन असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, सामान्याचे प्रश्न साेडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे, असे अभय साळुंके म्हणाले.
सर्वसामान्यांचे प्रश्न साेडविण्यासाठी प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:21 IST