त्यांच्या पार्थिवावर लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात तीन मुले, सुना, नातू, पणतू असा परिवार आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल कंपनीचे माजी व्यवस्थापक विश्वनाथ सावळे व लातुरच्या सिद्धेश्वर बँकेचे माजी व्यवस्थापक काशीनाथ सावळे यांचे ते वडील होत.
फोटो ०७ सावळे
उद्धव पांचाळ यांचे निधन
अहमदपूर : येथील न्यू विद्यानगर कॉलनीतील रहिवासी उद्धव हरिभाऊ पंचाळ (४८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मांडणी ता.अहमदपूर येथे गणिताचे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांच्यापश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
रमाकांतअप्पा मलशेट्टे
उदगीर : किनी यल्लादेवीचे माजी सरपंच व प्रगत शेतकरी रमाकांतअप्पा गुरुबसप्पा मलशेट्टे ( ६८) यांचे उदगीर येथे उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी किनी यल्लादेवी ता.उदगीर येथे त्यांच्या शेतात अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. डॉ.बस्वराज मलशेट्टे यांचे वडील होत.
अरुणाबाई एनकफळे
चाकूर : येथील भाजपाच्या माजी नगरसेविका अरुणाबाई सुरेश एनकफळे (५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याची प्रकृती ठीक नसल्याने नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर चाकूर येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पती, दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
हरिश्चंद्र बलशेटवार
शिरूर ताजबंद: येथील हरिश्चंद्र गोविंदराव बलशेटवार (वय ५८) यांचा शुक्रवारी कोरोनाने मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी बलशेटवार यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर, उदगीर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता. त्यांच्यावर येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, दोन बहिणी, दोन भाऊ असा परिवार आहे.
माधव फड
किनगाव : अहमदपुर तालुक्यातील हिंगणगाव येथील माधव दत्ता फड (३९) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी हिंगणगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. माधव फड हे एक वर्षापूर्वीच सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले होते.