शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

किल्लारी भूकंपातील मृतात्म्यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 16:33 IST

बुधवार दि. ३० रोजी किल्लारी भुकंपातील मृतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.

किल्लारी : ३० सप्टेंबर ही तारीख आजही किल्लारीकरांसह अवघ्या महाराष्ट्रालाच थेट १९९३ सालात घेऊन जाते आणि हजारो नागरिकांचे प्राण घेणाऱ्या प्रलयंकारी भूकंपाच्या कटू आठवणी जाग्या होतात. त्यामुळेच बुधवार दि. ३० रोजी किल्लारी भुकंपातील मृतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.

यावेळी तहसीलदार शोभा पुजारी, आ. अभिमन्यू पवार, सरपंच शैला लोहार, उपसरपंच युवराज गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप लोहार, सहायक पोलीस निरीक्षक म्हेत्रेवाड, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

२७ वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपात या परिसरातील हजारो नागरिकांचा जीव गेला. परिसरातील अनेक गावे उद्ध्वस्त झाली. मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. त्यामुळे दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी किल्लारी गावात उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभासमोर श्रद्धांजली अर्पण करण्यात येते.

पुनर्वसनात अनेकांना घरे मिळाली. परंतु, कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्याने घराची गरज निर्माण होत आहे. यासह येथील नागरिकांसमोर सध्या अनेक नागरी प्रश्न असून या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

ज्यांनी या भुकंपात आपल्या आप्तांना गमवले होते, त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी दाटून आले आणि त्यांच्या आठवणींनी मन उचंबळून आले. अतिशय भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

 

टॅग्स :EarthquakeभूकंपKillari Earthquakeकिल्लारी भूकंपMarathwadaमराठवाडा